सुरेश धस यांचे बिंग फोडण्यामागे राजकारण आहे का ? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Published on -

१८ फेब्रुवारी २०२५ बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पोटतिडकीने आमदार सुरेश धस यांनी प्रकरण समाजासमोर मांडले होते, ते देशमुख कुटुंबीयांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, अशी माझी भाबडी समजूत होती. मात्र, धस यांनी माझा भ्रमनिरास केला, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी धस यांना लगावला.

खा. सुप्रिया सुळे सोमवारी बारामती दौऱ्यावर होत्या.या वेळी त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्या मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.त्यानंतर परळी शहरालाही खा.सुळे भेट देणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करून त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला का ? आणि सुरेश धस यांचे बिंग फोडण्यामागे राजकारण आहे का ? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून या प्रकरणाकडे पाहिले नाही.मला फक्त माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे पाहायचे आहे.

सहकारी संस्थेमध्ये राजकारण नको

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार का,या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी याच्याकडे राजकारण म्हणून पाहत नाही.सहकारी संस्थेमध्ये राजकारण यायला नको.मात्र जर शेतकरी अस्वस्थ असतील आणि शेतकऱ्यांना ही निवडणूक लढायची असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे नेमके काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe