Maharashtra monsoon 2022 : महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? आयएमडीनं केलं जाहीर

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra monsoon 2022 : यावर्षी हवामान विभागानं अंदाज वर्तविल्याप्रमाणं मान्सूनची वाटचाल लवकर सुरू झाली आहे. अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला आहे.

मात्र, तो महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार? याची उत्सुकता आहे.याचंही उत्तर आता मिळालं आहे.महाराष्ट्रात ५ जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज, पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळकर यांनी वर्तविला आहे. सरकारच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलताना होसाळकर यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, अंदमानमध्ये १६ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. आता त्याचे भारतीय किनारपट्टीवर म्हणजे केरळमध्ये २७ मे रोजी आगमन होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात तळ कोकणात ५ जूनला मान्सून येईल. आपल्याकडं साधारणपणे सात जूनला मान्सूनचं आगमन होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe