महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरे आहेत, जेथे श्रीमंतांची वस्ती आहे. त्यातलंच एक शहर असं आहे जी महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी तर आहेच पण भारताचे ऑक्सफोर्ड म्हणूनही त्याची ख्याती आहे. विशेष म्हणजे हे शहर मुंबई व नगरपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर आहे. त्याचं नाव आहे, पुणे. पुण्यात असं काय आहे? ते आपण पाहू.
गडगंज श्रीमंत व्यक्ती
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. औद्योगिक, कृषी, सेवा क्षेत्रात पुण्याचे मोठे योगदान राहिले आहे. या जिल्ह्याचा जीडीपी 3 लाख 68 हजार 478 कोटी एवढा आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ते ओळखले जाते. ती मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. मुंबई प्रमाणेच पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. येथे गडगंज श्रीमंत व्यक्तींची वस्ती आहे.

कोरेगाव पार्क
पुण्यातील श्रीमंत परिसरातील एक परिसर म्हणजे कोरेगाव पार्क होय. पुणे शहराच्या पूर्वेकडे असणारा कोरेगाव पार्क हा परिसर शहरातील केंद्राशी जोडला गेला आहे. या ठिकाणी शाळा, मॉल, हॉस्पिटल सारख्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे वास्तव्य करणे अनेकांना आवडते.
कल्याणी नगर
कल्याणी नगर परिसर हा पुण्यातील दुसरा श्रीमंत परिसरापैकी एक आहे. पुण्यातील अनेक श्रीमंत लोक याच परिसरात राहतात. एवढंच नव्हे तर या परिसराला कर्मशियल मागणी देखील खूप आहे. या शहारत मॉल, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे श्रीमंत लोक या भागाला चांगली पसंती देतात. अनेकजण येथे वास्तव्यास आहेत.
औंध
पुण्यातील औंध परिसरातील अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी राहतात. पुण्यातील अनेक श्रीमंत लोक तुम्हाला पुण्यातच सापडतील. हा परिसर एअरपोर्टजवळ असल्याने या परिसराला चांगलीच डिमांड आहे . शहरातील इतर भागांशी पोहोचणे येथून सहज शक्य होते. तसेच येथे अनेक शिक्षण संस्था आहे.
मॉडल कॉलनी
मॉडल कॉलनी हा परिसर पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. शिवाय येथून शहरातील अनेक भागांत जाणेही अगदी सोप्पे होते. या परिसरातून शहाराला चांगली कनेक्टिविटी आहे. या परिसरात शाळा, मॉल, रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे शहरांतील अनेक श्रीमंत लोक राहतात.
एनआयबीएम रोड
हा परिसर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. शिवाय हा परिसर अगदी चांगला समजला जातो. या परिसरात अनेक व्हिला आणि उंच अपार्टमेंट आहे. येथून मगपट्टा, कोंढवा आणि कल्याणी नगर परिसराला चांगली कनेक्टिविटी आहे. येथेही अनेक श्रीमंत व्यक्ती राहत आहेत.