अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनासह अनेक महत्वाच्या शासकीय जबाबदा-या त्यांना पार पाडण्यास अडचण येणार असल्याने मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला जाणार की शिवसेनेचे गटनेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्याकडे देणार यावर समूह माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाल्याने रिलायन्स हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्यांना नेमका डिस्चार्ज कधी मिळेल त्याबाबतची माहिती देण्यात आली नाही.
मात्र मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही किमान दोन महिने आराम करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनासह नेक महत्वाच्या जबाबदा-याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार कुणा वरिष्ठ मंत्र्याना द्यावा लागणार असल्याचे समूह माध्यमांत बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्याच्या खालोखाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो असे देखील समूह माध्यमांत चर्चिले जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आल्याची चर्चा रंगली त्यावेळी स्वत: शिंदे यांनी त्याबाबत इन्कार करत मुख्यमंत्री एकदोन दिवसातच तंदुरूस्त होवून घरी येतील असे म्हटले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम