दुध भेसळी विरोधात उद्योजकांवर कारवाई केल्यास शेतकऱ्याचं दूध कोण खरेदी करणार ? दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : सध्या दुधाचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी कोलमडला आहे. यामागे दूध भेसळ, भेसळ युक्त दुधाचे प्रमाण आदी करणे देखील आहेत. दूध भेसळीविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

पशुधन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दूध भेसळीविरोधात नेहमीच बोलत आले आहेत. तसेच त्यांनी मध्यंतरी यावर कारवाया देखील सुरु केल्या होत्या. परंतु आता त्यांनी दूध भेसळीवर करावया जास्त का केल्या जात नाहीत याची काही करणे सांगितली आहेत. ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी बोलत होते.

* काय म्हणाले मंत्री विखे पाटील

विखे पाटील म्हणाले की, राज्यात सुमारे ३० टक्के भेसळयुक्त दूध आहे. जर या विरोधात खाजगी दूध प्रक्रिया उद्योजकांवर कारवाई केली तर ते दूध खरेदी करणार नाहीत व त्यातून समस्या निर्माण होईल. त्यांनी जर दूध घेतले नाही तर मग दूध कोणाला घालणार?

अशी प्रतिक्रीया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. त्यांनी एक उदाहरण देखील दिलं, ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी श्रीगोंदे येथे दूध भेसळ विरोधात कारवाई केली होती. तर एकाच दिवसात ६० हजार लिटर दूध कमी झाले.

त्यामुळे कडक कारवाई करण्यात आडचणी येत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली व त्या उद्योजकांनी दूध घेतले नाही तर दूध कोठे घालायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहील असे ते म्हणाले. परंतु आता सरकारने कालच एक नविन निर्णय घेतला आहे

त्यामुळे दुधातील भेसळ कमी होण्यास मदत होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधत होते.

* नुकसानग्रस्तांना भेटी

मंत्री विखे पाटील यांनी पारनेरमधील नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच नुकसान भरपाई लवकर देऊ असे आश्वासन देखील दिले. त्यानंतर ते राळेगणला अण्णा हजारे यांच्या भेटीला गेले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe