Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील सत्तासमीकरने अत्यंत वेगाने बदलत आहेत. लोकसभेच्या हिशोबाने अनेकांना सोबत घेण्याचे काम सध्या भाजपने सुरु केले आहे. परंतु यात निष्ठावंत भाजप समर्थकांवर अन्याय होत असल्याची चर्चा होत असते. त्यात बऱ्याचदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने पुढे येते.
धनंजय मुंडेंना संधी ?
आजपर्यंत पंकजा मुंडे यांना भाजपकडून मोठी संधी मिळाली नाही. आता येत्या आमदारकीला भाजप मुंडे यांचे पुनर्वसन करेल असे वाटत होते. परंतु आता परळीची जागा धनंजय मुंडे यांना सोडणार असल्याचे चर्चा सुरु आहे.
कारण अजित दादा सत्तेत सहभागी असल्याने आणि अजित पवार व शानंजय मुंडे यांचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे ही जागा धनंजय मुंडेंना सोडली जाईल असे चर्चिले जात आहे.
वंजारी समाजबांधवात इतरांना पर्याय म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ?
वंजारी समाजबांधवात पंकजा मुंडे यांना इतरांना पर्याय म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. कारण या समाज बांधवांचे एकगठ्ठा मतदान पंकजा ताईंना होते. त्यामुळे यांना पर्याय म्हणून इतर समाजबांधवांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सध्या भाजपकरत आहे का असे काही उदाहरणांवरून दिले.
पक्ष विचारेल ही पंकजा ताईंना अपेक्षा
परळीची जागा भाजपने धनंजय मुंडेंसाठी सोडल्यास काय? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मला परळी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मला आशा आहे की पक्ष मला याबाबत विचारेल. कारण परस्पर निर्णय घेण्याची पक्षीय संस्कृती नाही.
भाजपशिवाय दुसरा पर्याय पंकजा मुंडे स्वीकारू शकतील का?
पंकजा मुंडे भाजप सोडून दुसरा पर्याय स्वीकारतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अनेक समर्थक किंवा इतर पक्षातून देखील अशा ऑफर आलेल्या आहेत. परंतु पंकजा मुंडे सध्या तरी तसा मार्ग स्वीकारतील असे वाटत नाही. कारण त्यांनी एका मुलाखतीत याबाबत उत्तर दिल होत की,
मला काही नवीन करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तसाही इच्छा नाही. मधल्या घडामोडींनंतर मी स्वत:ला प्रस्थापित करू शकले असते. पण तसा विचार मी चुकूनही करू शकत नाही. माझ्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून मी प्रार्थना करते असेही त्या म्हणाल्या होत्या.