८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांचा उपलब्ध साठा व गुणवत्ता याची नवीन नियमावली प्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले.जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत सर्वत्र तातडीने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी.
सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधांच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्ये २४ ते ४८ तासांच्या आत घ्याव्यात.औषधसाठ्याच्या समूह क्रमांकनिहाय नोंदी बिनचूक असाव्यात.खरेदी केलेल्या सर्व औषधांचे बॅच निहाय नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी.कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पुरवठादार कंपनी व प्रयोगशाळा यांचा संपर्क होणार नाही (Double Blinding) अशी व्यवस्था करावी.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-30.jpg)
प्रत्येक औषधाचा प्रत्येक समूह क्रमांक तपासणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, याकरिता त्रयस्थ NABL प्रयोगशाळा अथवा खरेदी प्राधिकरणामार्फत निर्धारित झालेल्या मानांकित प्रयोग शाळेमार्फत तपासणी करावी.औषधसाठा प्राप्त झाल्यापासून तपासणी अहवाल विहित कालावधीत प्राप्त होईपर्यंत औषधसाठा स्वतंत्र ठेवण्यात यावा.अहवालानुसार प्रमाणित केलेल्या औषधांचा वापर करण्यात यावा.
तसेच औषधे अप्रमाणित आढळून आल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्यास त्या औषधाचा तत्काळ वापर थांबवण्यात यावा, या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत.महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने आरोग्य विभागांतर्गत जिल्हास्तरावरील औषध भांडाराकडून एकूण ८६ औषधांचे नमुने NABL प्रयोगशाळांना पाठवले होते.
त्यांपैकी ३२ नमुन्यांचा अहवाल वापरण्यास योग्य असून, ५४ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.तसेच वैद्यकीय शिक्षण औषध भांडाराकडून मागविण्यात आलेले ६९ औषधांचे नमुने NABL प्रयोगशाळांना पाठविण्यात आले होते.त्यांपैकी १४ नमुने वापरण्यास योग्य आहेत.तसेच ५५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
राज्यातील आरोग्य संस्थात पुरवठा होत असलेली औषधे प्रयोगशाळेत काटेकोरपणे तपासून घ्यावीत. तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे प्रकाश आबिटकर यांनी सूचित केले आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून सन २०२३-२४ मध्ये १२ हजार ७६७ प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती.
त्यांपैकी १ हजार ८८४ नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांपैकी १ हजार ७७२ नमुने वापरण्यास योग्य असून, ३ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. अद्याप १०९ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.तसेच सन २०२४-२५ मध्ये ९ हजार ६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यांतील ४ हजार ६९१ नमुन्यांपैकी ३ हजार १७९ नमुने वापरण्यास योग्य असून, ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत.
तसेच १ हजार ५०७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवालानुसार, वापरण्यास अयोग्य असलेल्या बॅचेस सर्व संबंधितांना कळविण्यात आले असून, त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.
राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून सन २०२३-२४ मध्ये १२ हजार ७६७ प्रकारच्या औषघांची खरेदी करण्यात आली होती. त्यांपैकी १ हजार ८८४ नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांपैकी १ हजार ७७२ नमुने वापरण्यास योग्य असून, ३ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. अद्याप १०९ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.
तसेच सन २०२४-२५ मध्ये ९ हजार ६०० प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यात आली. त्यांतील ४ हजार ६९१ नमुन्यांपैकी ३ हजार १७९ नमुने वापरण्यास योग्य असून, ५ नमुने वापरण्यास अयोग्य आहेत. तसेच १ हजार ५०७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवालानुसार, वापरण्यास अयोग्य असलेल्या बॅचेस सर्व संबंधितांना कळविण्यात आले असून, त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.