अल्पवयीन आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार का? न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

Published on -

Maharashtra news:अठरा वर्षाच्या आतील बालकांना देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

त्यामुळे आरोपी म्हणून तक्रारीत नाव असणाऱ्या बालकांनाही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेता येणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांसमोर एका बालकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र बालकांच्या संरक्षणासाठीचा कायदा २०१५ मध्ये बालकाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. त्यामुळे हा अर्ज प्रथम फेटाळण्यात आला.

त्यानंतर तो दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर गेला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अर्जदारातर्फे अड. सुविध कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.

बालकांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ नुसार अर्ज करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत अड. विवेक राठोड, अड. प्रतिक्षा काळे व अड विशाल कदम यांनीही या प्रकरणात अर्जदाराच्यावतीने बाजू मांडली.

या प्रकरणात सिनियर कौन्सिल राजेंद्र देशमुख यांनी अबॅकस क्युरी म्हणून काम पाहिले. न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती देशपांडे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेत अठरा वर्षाच्या आतील बालकांनाही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News