Manoj Jarange Patil : आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही

Ahilyanagarlive24 office
Published:

Manoj Jarange Patil : मराठा सम्मानाच्या एकजुटीमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत कुणबीच्या ३२ लाखावर नोंदी आढळल्या आहेत. यामुळे दोन कोटी बांधवांना याचा फायदा होणार आहे.

मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे, यासाठी समाजाने शेवटपर्यंत एक्काजूट राहावे, माझ्यावर कितीही संकटे आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विराट सभेत व्यक्त केला.

शहरातील जाणता राजा मैदानावर आयोजित विराट सभेत ते बोलत होते. सभेला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे यांचे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास व्यासपीठावर आगमन झाले.

शहरातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून त्यांनी सभेला सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, आरक्षणाची लढाई समाजाने हाती घेतली आहे. मराठ्यांनी यापूर्वी आरक्षण समजून घेतले नाही.

काही नेत्यांनी सर्वसामान्य मराठ्याला यापूर्वी आरक्षण समजू दिले नाही आरक्षण समजले तर समाज उठाय करेल या भावनेतून काहींनी जाणीवपूर्वक आरक्षण समजू दिले नाही. मराठ्यांना ७० वर्षांपूर्वीच आरक्षण होते पण ते देण्यात आले नाही.

समाजाला आरक्षण आहे हे समजल्यावर राज्यातील मराठा समाज ताकदीने एकजूट झाला. यासाठी आंदोलने झाली. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे.

सरकार पुढे दखल घेतल्याशिवाय पर्याय नव्हता, आरक्षण नसल्यामुळे मराठा बांधवांच्या मुलांचे करिअर चरबाद झाले. अनेकांचे जीव गेले. तरीही मराठ्यांना आरक्षण मिव्यले नाही. या पुढील काळात आपल्या मुलांचे वाटोळे होऊ देऊ नका

१९६७ साली व्यवसायावर आधारित आरक्षण देण्यात आले मात्र मराठ्‌यांना हे आरक्षण दिले गेले नाही, मराठा समाज चापूर्वी आरक्षणातून तिनदा हुकला आहे. यापूर्वी मराठयांचे पुरावे लपून ठेवण्यात आले होते.

आंदोलन सुरू झाल्यानंतर आता पुरावे कसे मिळाले असा सवाल जरांगे यांनी केला. मराठा समाजाला ७० वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर या समाजाचा विकास झाला मात्र जाणीवपूर्वक समाजाला आरक्षण देण्यात आले नाही.

मराठा समाज मोठा होऊ नये यासाठी काहींनी पडयंत्र रचले होते. त्यांनीच पुरावे दाबले. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाला विरोध केला नाही.

समाजाने सरळ हाताने सर्वांना मदत केली मात्र ज्यांना सहकार्य केले तेच आता विरोध करत आहे. आज मराठयांच्या मुलाला मदतीसाठी कोणी येत नाही. मराठा समाजाने सर्वच पक्षांना मोठे केले. मराठा आरक्षणासाठी समाज बांधवांनी आता एकत्रितपणे ताकदीने लढायचे आहे. आरक्षणाची लढाई आपण ८५ टक्के जिंकली आहे. समाज एकजूट राहिला तर ही लढाई आपण शंभर टक्के जिंकणार आहोत.

आपण कोणाला घाबरत नाही. कुणी आपल्याला मॅनेज करू शकत नाही. उपोषणादरम्यान अख्ख मंत्रिमंडळ माझ्याजवळ बसून होतं मात्र समाजासाठी आपण नियत बिघडू दिली नाही. समाजाबाबत आपण कधीही गद्दारी करणार नाही.

आरक्षण देऊन मराठा समाजाच्या मुलांच्या चेहन्यावर आपल्याला हसू पहावयाचे आहे. कुणी कितीही विरोध करू द्या, शांततेत आंदोलन करा, सरकार कसे आरक्षण देत नाही ते मी पाहतो. १ डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा. आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय माधार घ्यायची नाही.

याप्रसंगी प्रदीप सोळुके यांच्यासह कुमारी गार्गों घुले, कुमारी मानवी एरंडे या छोटया मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. शहरांमध्ये साखळी उपोषण करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकत्र्यांचा मनोज जरांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन मिलिद कानवडे व गायत्री ढेरंगे यांनी केले.

सभेसाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व मराठा समाज बांधव मोठ्‌या संख्येने उपस्थित होते. या सभेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. होते. सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe