Maharashtra News : सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार कोंढव्यातील अजमेरा पार्क येथे शुक्रवारी (दि. १५) उघडकीस आला. यासंदर्भात, तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फरजीन मोहसीन शेख (वय ३५, रा. कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती मोहसीन अस्लम शेख (वय ३८), शिरीन अस्लम शेख (वय ३५), शाहीन अस्लम शेख (वय ४०, सर्व रा. कोंढवा ) यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-160416-suicidefb-780x470-1.jpg)
याप्रकरणी जाहेद शेख (वय ४०, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मोहसीन आणि फरजीन यांचा २००७ मध्ये विवाह झाला होता. घरगुती भांडणातून मोहसीन व त्याच्या बहिणी तिला वारंवार त्रास देत होत्या.
या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून फरजीनने १३ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.