महाराष्ट्रात महिला असुरक्षित! राज्यातील तब्बल 24 हजार महिला बेपत्ता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्यातील महिलांसंबधी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आलं आहे.(women missing)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २०२० अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे 24 हजार 579 महिला बेपत्ता आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत.

बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यांच्या आत करणे चौकशी अधिकाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित खटले प्रलंबित असल्याच्या संदर्भात प्रकाश फातर्पेकर, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील 63 हजार 252 बेपत्ता महिलांपैकी 40 हजार 095 महिला सापडल्या, तर 4 हजार 517 बेपत्ता अल्पवयीन मुलींपैकी 3 हजार 95 अल्पवयीन मुली सापडल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, गेल्या सात वर्षात 25 हजार 469 सायबर गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापैकी 6 हजार 306 गुन्हे उघडकीस आले.

यापैकी 383 प्रकरणे न्यायालयात निकाली निघाली असून त्यामध्ये 99 आरोपींना शिक्षा झाली अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात दिली. गेल्यावर्षी राज्यात 2 हजार 163 खून झाले त्यापैकी 564 खून महिलांचे झालेत. प्रेमप्रकरणातून 116 तर अनैतिक संबंधांतून 183 जणींची हत्या झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News