श्रीरामपुर :- एका महिलेकडे पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणणार्या एका आंबट शौकिनाची या महिलेसह जमलेल्या महिलांनी व नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली.
श्रीरामपूर शहरातील डावखरवस्ती परिसरात काल सकाळी एक महिला जात असताना परिसरातील एका आंबट शौकिनाने सदर महिलेस ‘आय लव्ह यू’ म्हणत अश्लिल चाळे केले.

येता-जाता नेहमी त्रास देणार्या या आंबट शौकिनाचे हे वर्तन असह्य झाल्याने या महिलेने त्याला रस्त्यात पकडून त्याची धुलाई करण्यास सुरुवात केली.
हे पाहून शेजारील महिलांनीही त्याच्यावर चांगलाच हात साफ केला. महिलांबरोबरच काही नागरिकांनीही त्याची चांगली धुलाई केली.
नंतर त्या महिलांसह नागरिक शहर पोलीस ठाण्यात गेले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ‘त्या आंबट शौकिनास’ पकडून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी परिसरातील महिलांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला.