पुण्यात चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत, याप्रकरणी समर्थ, मुंढवा, मार्केट यार्ड आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत शाळकरी मुलीला दारू पाजून अल्पवयीनांनी बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या मित्रांसह आरोपींवर गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केलेले आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार अल्पवयीनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि एका मुलाची ओळख होती.
त्याने मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले, तेथे तिला दारू पाजली.
दारूच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने या कृत्याचे मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग केल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शेजाऱ्याकडून अत्याचार
घराशेजारी राहणाऱ्या २६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यााविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी भीमप्या महौचाळ (२१) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कार, २० लाखांचे दागिनेही लुटले
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही २९ वर्षीच तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत, त्याचे व्हिडीओ, फोटो काढले,
यानंतर आरोपीने पीडितेच्या आईचे २० लाखांचे दागिने घेऊन नुटले. याप्रकरणी मार्केट वार्ड पोलिस ठाण्यात हर्ष महेट महाडीक (२१, रा. गोकुळनगर, कात्रज) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे