Xiomi EV : मोबाईल, टीव्ही सारखे अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणाऱ्या Xiaomi कंपनीने पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या डेब्यूपूर्वीच, सोशल मीडियावर ईव्हीचे फोटो लीक झाले आहेत. लीकनुसार या कारचे फीचर्स काय असतील ते तुम्ही जाणून घ्या.
लीक केलेला फोटो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता Xiaomi कडून इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी केली जात आहे. या कारचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला असून हा फोटो शाओमीच्या आगामी इलेक्ट्रिक कारचा असल्याचा दावा केला जात आहे.
नाव काय असेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Xiaomi च्या इलेक्ट्रिक कारचे नाव MS11 असू शकते. लीक झालेल्या फोटोमध्ये कारवर MS11 नेमप्लेटही दिसत आहे. कंपनीने 2021 मध्येच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. यासोबतच कंपनीने सांगितले होते की येत्या 10 वर्षांत कंपनी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
कार कशी दिसते?
कारमध्ये एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय ही कार ड्युअल टोन स्कीमसह दिसते. कारची रचना करताना एरोडायनॅमिक्सचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे कारची रेंज चांगली असण्याची अपेक्षा आहे.
चीनमध्ये सादर केले जाईल
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार चीनमध्ये चाचणीदरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. तसेच कंपनी ही सेडान इलेक्ट्रिक कार सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च करू शकते. यानंतर ते युरोपसह काही देशांमध्ये सादर केले जाईल.