साताऱ्यातील प्रसिद्ध म्हसवडची यात्रा रद्द… ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे झाला हा निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ अधिक आक्रमक झाल्याने म्हसवड यात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 5 डिसेंबरला पार पडणारा श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीचा रथोत्सव सोहळा ओमायक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

स्थानिक ग्रामस्थांना घेऊन रथोत्सव साजरा करण्याची विनंती प्रशासनाला ग्रामस्थांनी केली होती. मात्र, ही विनंती प्रशासनाने धुडकावून लावली. दरम्यान, ग्रामस्थांनी म्हसवड यात्रा झालीच पाहिजे अशी मागणी करत आपले आंदोलन उग्र केले.

दुकानांसह बाजारपेठा बंद करण्याचा धडाका सुरु केला. आंदोलन चिघळणार हे लक्षात येतातच दोन तासांसाठी ही यात्रा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हसवड यात्रेला प्रशासनाची सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर म्हसवड बाजारपेठ बंद मागे घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe