Bogus University In Maharashtra : भारताची अर्थव्यवस्था ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे, भारत लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणारा असा दावा काही अर्थतज्ञांनी केलेला आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी गुजरात येथील गांधीनगर येथे पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात 2024 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारत हा लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी गॅरंटी दिलेली आहे.
गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये मोदीची गॅरंटी विशेष लोकप्रिय झालेली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ही मोदीची गॅरंटी खरी ठरते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. एकंदरीत गेल्या काही वर्षांमध्ये भारताने चांगला विकास केला आहे. सर्वच क्षेत्रात भारताने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
शिक्षण क्षत्रात देखील देशाची प्रगती वाखाण्याजोगी आहे. मात्र असे असले तरी देशात आजही अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की फेक आहेत, बनावट आहेत. अशा युनिव्हर्सिटीमधून जर विद्यार्थ्यांनी डिग्री घेतली तर त्यांना कुठे नोकरी सुद्धा मिळणार नाही. विशेष म्हणजे या बनावट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी बनावट यूजीसी रिकगनाईज कॉलेज, युनिव्हर्सिटीचं प्रमाणपत्र दाखवतात. त्यामुळे भोळेभाबडे विद्यार्थी लाखो रुपयांची फी भरून अशा विद्यापीठांमधून डिग्री घेतात आणि मग त्यांना नंतर मोठा पश्चाताप करावा लागतो.
दरम्यान गेल्या वर्षी युजीसीने देशातील फेक म्हणजेच बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली होती. यामध्ये 20 विद्यापीठांची नावे समाविष्ट होती. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातीलही विद्यापीठाचा समावेश आहे. या परिस्थितीत आज आपण या वीस बनावट विद्यापीठांची नावे थोडक्यात जाणून घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना या विद्यापीठांपासून सावध राहता येईल.
महाराष्ट्रातील बनावट विद्यापीठांची यादी
महाराष्ट्रात फक्त एकच बनावट विद्यापीठ आढळून आले आहे. राजा अरबी विद्यापीठ, नागपूर हे विद्यापीठ बनावट असल्याची माहिती युजीसीने दिलेली आहे. त्यामुळे या विद्यापीठापासून विद्यार्थ्यांना दूर राहावे लागणार आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बनावट विद्यापीठांची यादी
1)अखिल भारतीय सार्वजनिक आणि शारीरिक आरोग्य
2)विज्ञान संस्था (AIPP HS) राज्य सरकारी विद्यापीठ,
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज दिल्ली
3)संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, दिल्ली
4)वॉकशिल विद्यापीठ, दिल्ली
5)ADR-केंद्रित न्यायिक विद्यापीठ, ADR हाउस, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली
6)भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, नवी दिल्ली
7) स्वयंरोजगारासाठी विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ, भारत, रोजगार सेवा सदन, संजय एन्क्लेव्ह
8)अध्यात्मिक विश्व विद्यालय, रोहिणी, दिल्ली
पुदुच्चरी येथील फेक विद्यापीठ
1)श्री बोधी अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, वाझुथावूर रोड, पुडुचेरी-६०५००९
यूपीचे बनावट विद्यापीठ
1) गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश
2) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश
3) नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अचलताल, अलीगढ, उत्तर प्रदेश
4)भारतीय शिक्षण परिषद, भारत भवन, लखनौ, उत्तर प्रदेश – 227 105
पश्चिम बंगालमधील बनावट विद्यापीठ
1)इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, कोलकाता
2)इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, ठाकूरपुरकुर, कोलकाता – ७०००६३
आंध्र प्रदेशचे बनावट विद्यापीठ
1)क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, श्रीनगर, गुंटूर, आंध्र प्रदेश
2)बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
कर्नाटक मधील बनावट विद्यापीठ
1)बडगणवी सरकार जागतिक मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्था, गोकाक, बेळगाव, कर्नाटक
केरळचे बनावट विद्यापीठ
1)सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम, केरळ