Maharashtra News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. ४ रोजी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महामार्गावर जेऊर शिवारातील लिगाडे ( तोडमल) वस्तीवर झालेल्या अपघातात प्रवीण रामराव तोडमल ( वय ४० रा. जेऊर ता. नगर) याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत श्रीकांत तोडमल यांनी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तोडमल वस्ती येथील हनुमान मंदिरासमोरून
![Ahmednagar News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagar-Accident.jpg)
प्रवीण तोडमल रस्ता ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगर कडून नगरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्र.एम.एच. १२ क्यू.डब्ल्यू. ६०३०) जोराची धडक दिल्याने प्रवीण याचा मृत्यू झाला आहे.
कंटेनर चालक गजानन अवचित सूर्यवंशी (वय ५० रा. लोहगाव, जिल्हा पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रवीण याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, भाऊ, आई, वडील असून, त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.