Post Office Scheme:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि निश्चित परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या योजना गेल्या काही वर्षांपासून खूप लोकप्रिय झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक वेगळ्या प्रकारच्या एफडी योजना राबवल्या जातात तसेच बऱ्याच प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण असे छोट्या बचत योजना देखील राबवल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या छोट्याशा उत्पन्नाचा काही भाग बचत करून तो जर गुंतवून चांगला पैसा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना या फायद्याच्या ठरताना दिसून येत आहेत. अगदी तुम्हाला देखील तुमची छोटीशी बचत गुंतवून चांगला परतावा मिळवायचा असेल तर या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या अशाच एका महत्वाच्या योजनेची माहिती आपण घेणार आहोत. जी गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून ओळखली जाते.
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना
पोस्ट ऑफिसची पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना अतिशय विश्वासार्ह आणि लोकप्रिय असा गुंतवणूक पर्याय आहे व ज्या नागरिकांना जोखीम न घेता गुंतवणूक करून चांगला पैसा मिळवायचा आहे त्यांच्याकरिता ही योजना अगदी फायद्याची अशी आहे. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सरकार दरवर्षी 7.1% इतके करमुक्त व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर याकरिता 15 वर्षाचा लॉक इन पिरीयड देण्यात आलेला आहे व यामध्ये पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाच वर्षांसाठी हा कालावधी वाढवू देखील शकतात.

पंधरा वर्षात चाळीस लाख रुपये कसे मिळतील?
समजा तुम्ही प्रत्येक वर्षाला आज दीड लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली किंवा महिन्याला बारा हजार पाचशे रुपये गुंतवत गेले आणि त्यावर 7.1% इतका व्याजदर मिळाला तर पंधरा वर्षाच्या शेवटी तुमची एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये होते. या गुंतवणुकीवर तुम्हाला जे काही व्याज मिळते त्या व्याजासह तुमची एकूण रक्कम 40.7 लाख रुपये होते. तसेच या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही पाचशे रुपयांपासून देखील गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व वर्षाला जास्तीत जास्त दीड लाखांची गुंतवणूक यामध्ये करता येते. महिन्याला एका लहान रक्कम यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. तुम्ही महिन्याला जर 12500 रुपये गुंतवत गेला तर वर्षात तुमचे दीड लाख रुपये यामध्ये गुंतवले जातात. विशेष म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला सरकारचे संरक्षण या माध्यमातून मिळत असते व तुमचा पैसा देखील यामध्ये सुरक्षित राहतो. या पीपीएफ योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत जमा केलेले एकूण रकमेतून तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कर्ज देखील मिळू शकते.