शेअर बाजार हा अनिमयमिततेचा खेळ समजला जातो. मात्र एखादा असा शेअर असतो जो अगदी अल्पावधीत मालामाल करुन जातो. आज आपण अशाच एका शेअरबद्दल माहिती घेऊ ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले.
मालामाल करणारा स्टाँक कोणता?
हजूर मल्टी प्रोजेक्ट्स हा असा एक पेनी स्टॉक होता जो आता मल्टीबॅगर झाला आहे. कंपनीचे शेअर्स पाच वर्षांत १३ पैशांवरून ४४ रुपयांपर्यंत वाढले आहेत. पाच वर्षांत हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये ३४,००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मल्टीबॅगर कंपनीने आपले शेअर्स देखील विभागले आहेत. हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६३.९० रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३२ रुपये आहे.

१ लाखांचे केले ३ कोटी
१५ एप्रिल २०२० रोजी हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सचा पेनी स्टॉक फक्त १३ पैशांवर होता. १७ एप्रिल २०२५ रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४४.६५ रुपयांवर ते बंद झाले. पाच वर्षांत हुजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स ३४२४६ % नी वाढले. एखाद्या व्यक्तीने १५ एप्रिल २०२० रोजी हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याच्या शेअर्सची किंमत आता ३.४३ कोटी रुपये झाली असती.
शेअर्स १३०००% वाढले
गेल्या चार वर्षांत हजूर मल्टी प्रोजेक्ट्सचे शेअर्स १३,००० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स ३४ पैशांवर होते. १७ एप्रिल २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४४.६५ रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स १९११ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ३६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १२% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.