गुड न्युज ! राज्यातील 12वी पास विद्यार्थ्यांना न्यूयॉर्कमध्ये मिळणार स्कॉलरशिप, पदवीचे शिक्षण मिळणार फ्री

Published on -

Student Scholarship : भारताला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास 8 दशकांचा काळ उलटत चालला आहे. या आठ दशकांच्या काळात देशांनी प्रत्यक्षत्रात नेत्र दीपक कामगिरी केली आहे. मूलभूत व्यवस्था विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. याचा परिणाम म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही देशातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

विशेष म्हणजे येत्या काही वर्षात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर जाणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गुजरात येथे झालेल्या ग्लोबल समिट मध्ये मोदी यांनी भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल अशी गॅरंटी दिली आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता पाहायला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की महिला फक्त चूल आणि मुलच सांभाळत आहेत.

महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे, पण तरीदेखील भारताची पुरुष प्रधान संस्कृती कुठे ना कुठे महिलांच्या प्रगतीला आडे येत आहे. मात्र महिलांचा एकात्मिक विकास व्हावा त्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासन कटीबद्ध आहे. स्त्री भृण हत्या थांबवणे, स्त्री शिक्षणाला चालना देणे, महिलांचे सबलीकरण करणे, उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.

राज्य शासन देखील मुलींच्या कल्याणासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी झगडत आहे. अशातच मात्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहेटन कम्युनिटी कॉलेज अर्थातच बीएमसीसी या समुदाय महाविद्यालयाने महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

या संबंधित विद्यार्थिनींना आता या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने या महाविद्यालयाशी यासंदर्भात करार केला होता. या करारानुसार ही शिष्यवृत्ती ऑगस्ट 2024 पासून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या शिष्यवृत्तीसाठी ज्या मुलींची निवड होईल त्यांच्या ऍडमिशनचा खर्च, ट्युशनचा खर्च या शिष्यवृत्तीतून उपलब्ध होणार आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच त्यांच्या राहण्याच्या खर्चातही सवलत राहणार आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींना देखील परदेशात शिक्षण घेता येणार आहे. http://www.bmcc.cuny.edu/apply या अधिकृत संकेतस्थळावर या शिष्यवृत्ती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबई मधील जुहू स्थित ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (SNDT) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!