17 बँका आणि 7000 कोटींची FD; गुजरातचं ‘हे’ गाव आशियात सर्वात श्रीमंत गाव!

आपल्या भारतातील असे एक गाव आहे, जे आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून गणले जाते. गुजरातमधील माधापूर हे आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. NRI लोकांच्या पाठिंब्यामुळे येथे तब्बल 7,000 कोटींपेक्षा जास्त FD आहेत. या गावाच्या विशेषताबद्दल अधिक पाहुयात-

Published on -

Asias Richest Village | आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावं लगेच आठवतात. मात्र, एक संपूर्ण गाव असं आहे, ज्याच्या संपत्तीच्या आकड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. गुजरात राज्यातील भुजजवळ वसलेलं माधापूर हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जातं.

डॉलरमध्ये येतो पैसा

माधापूर गावाची लोकसंख्या सुमारे 32,000 इतकी आहे. पण या गावातल्या लोकांनी देशातील विविध बँकांमध्ये मिळून तब्बल 7,000 कोटी रुपयांच्या एफडीज केल्या आहेत. एवढंच नव्हे तर, भारत सरकारनेही या माहितीला अधिकृत मान्यता दिली आहे. गावात सध्या एक-दोन नाही तर एकूण 17 बँका कार्यरत आहेत, ज्यात SBI, ICICI, HDFC, PNB आणि अन्य नामांकित बँकांचा समावेश आहे.

माधापूरच्या या अफाट संपत्तीमागे अनिवासी भारतीयांचं मोठं योगदान आहे. या गावाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 65 टक्के लोक परदेशात स्थायिक आहेत. आफ्रिका, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये काम करणारे हे लोक आपल्या गावात नियमितपणे पैसे पाठवत असतात. विशेषतः आफ्रिकेतील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा वाटा मोठा आहे.

विकासाचं मॉडेल ठरलं गाव-

या पैशाचा उपयोग फक्त बँकेत जमा होण्यासाठी केला जात नाही. माधापूर हे गाव विकासाचं मॉडेल मानलं जातं. येथे दर्जेदार रस्ते, तलाव, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्रं, मंदिरं अशी सर्व मूलभूत सुविधा आहेत. गावात शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो.

माधापूरचे लोक जगभर विखुरले गेले असले तरी गावाशी असलेली नाळ अजूनही तुटलेली नाही. ते केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी पैसे पाठवत राहतात. त्यामुळे माधापूर आज केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही एक उदाहरण ठरलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News