FD Interest Rate : प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवायचा असतो. जेणेकरून भविष्यातील गरजा त्यांना भागवता येतील. सध्या बाजरात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे.
गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण त्यात मार्केट रिस्क नाही. याशिवाय, निश्चित व्याजदराने निर्धारित वेळेत परतावा देखील मिळतो. ज्येष्ठ नागरिक FD वर सामान्य लोकांपेक्षा जास्त व्याज मिळतात. आज आपण अशाच बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जेष्ठ नागरिकांना जास्त परतावा ऑफर करतात.
‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज
बँक ऑफ बडोदा
ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देते. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन वर्षांत 1.26 लाख रुपये मिळतील.
अॅक्सिस बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.60 टक्के दराने व्याज देते. तीन वर्षांसाठी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक येथे वाढून 1.25 लाख होते. म्हणजेच एक लाखाच्या व्याजावर ग्राहकांना 25 हजारापर्यंत फायदा मिळतो.
पंजाब नॅशनल बँक
या बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याजदरासह परतावा देतात. यात एक लाखाची गुंतवणूक तीन वर्षांनंतर 1.25 लाख होते.
ICICI बँक आणि HDFC बँक
या बँका देखील तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देतात. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला कालावधी संपल्यानंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळतो.