Top stocks : शेअर बाजार हे एक अद्भुत ठिकाण आहे. इथे कोण किती पैसे कमवील हे सांगता येणे कठीण आहे. गेल्या महिन्यातील शेअर बाजारातील रिटर्न्सवर नजर टाकली तर तो जवळपास 2 टक्क्यांच्या आसपास आहे.
टॉप 4 शेअर असे आहेत कि त्यांचे रिटर्न्स 150 टक्क्यांपर्यंत गेला आहे. चला जाणून घेऊयात हे टॉप 4 शेअर्स.
CDG Petchem : हा शेअर महिन्यापूर्वी 15.01 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 37.64 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 150.77 टक्के रिटर्न दिले आहेत.
GVK Power & Infrastructure Ltd : हा शेअर आज महिन्यापूर्वी 5.04 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 12.53 रुपये आहे. या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 148.61 टक्के परतावा दिला आहे.
Stratmont Industries : या शेअरची किंमत महिन्यापूर्वी 19 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 45.45 रुपये आहे. या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 139.21 टक्के परतावा दिला आहे.
Computer Point : महिनाभरापूर्वी कॉम्प्युटर पॉईंटचा शेअर 2.64 रुपयांवर होता. या शेअरची किंमत आता 6.26 रुपये प्रति शेअर झाली आहे. गेल्या महिनाभरात याने 137.12 टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिले आहेत.