पुढील आठवड्यात होणार 5 IPO लॉन्च! कोणता आयपीओ देईल सर्वाधिक रिटर्न? वाचा सविस्तर विश्लेषण

Published on -

Upcoming IPOs 2025:- आज शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं व याचं मुख्य कारण म्हणजे पुढील आठवड्यात येणारी आयपीओची भरघोस रांग. गुंतवणूकदारांचे लक्ष या नव्या कंपन्यांकडे लागलेलं आहे. २४ आणि २५ जूनला एकूण पाच मोठे आयपीओ खुल्या बाजारात प्रवेश करत आहेत. त्यामुळे दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा नवीन कंपन्यांचा उत्सव सुरू होणार आहे.

पुढील आठवड्यात येणारे आयपीओ

या सप्ताहात आयपीओ उघडणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स, एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस आणि कल्पतरू रियल इस्टेट या तीन कंपन्या मंगळवारी, २४ जून रोजी आपली प्राथमिक विक्री सुरू करणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जूनला एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि संभव स्टील ट्यूब्स यांचा आयपीओ खुला होणार आहे. एकत्रितपणे पाहिलं, तर या पाच कंपन्यांचा उद्देश जवळपास १५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करण्याचा आहे. यात एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ सर्वात मोठा असून तो एकटाच १२,५०० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करतोय.

ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स कंपनीचा आयपीओ

ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील असून ती ११९ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. तिचा आयपीओ २४ जून रोजी खुला होणार असून शेअरची किंमत ₹६७ ते ₹७१ या पट्ट्यात ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या नव्या शेअर्सचा एकूण इश्यू १.६८ कोटी शेअर्सचा आहे. खास बाब म्हणजे, ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या या शेअर्सचा जीएमपी म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम ₹१३ इतका आहे, म्हणजेच त्यांच्या इश्यू किमतीपेक्षा १८ टक्क्यांनी जास्त दराने हे शेअर्स अनौपचारिक बाजारात विकले जात आहेत.

एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस कंपनीचा आयपीओ

दुसरीकडे एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस ही कंपनी वैद्यकीय आणि औद्योगिक गॅसेस क्षेत्रात काम करते. तिचा आयपीओ देखील २४ जूनला सुरू होत आहे आणि ₹८५२.५३ कोटी उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये ₹४०० कोटी नव्या शेअर्सद्वारे आणि उर्वरित ₹४५२.५३ कोटीचे शेअर्स विक्रीसाठी सादर केले जातील. मात्र, सध्या या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. सध्याचं जीएमपी ₹० आहे.म्हणजेच कुठलाही प्रीमियम किंवा डिस्काउंट दिसून येत नाही.

कल्पतरू या कंपनीचा आयपीओ

कल्पतरू ही रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी देखील आपला १,५९० कोटींचा आयपीओ २४ जून रोजी उघडत आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्स दिले जाणार असून किंमत ₹३८७ ते ₹४१४ दरम्यान ठेवली आहे. सध्या या आयपीओचे जीएमपी ₹११ आहे, म्हणजेच या शेअर्सचा व्यवहार ग्रे मार्केटमध्ये ₹४२५ दराने होतोय.जो अधिकृत इश्यू किमतीपेक्षा सुमारे २.६६ टक्के जास्त आहे.

या सर्व घडामोडींवरून हे स्पष्ट होतं की गुंतवणूकदारांची नजर मुख्यत्वे ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स आणि कल्पतरूच्या आयपीओकडे वळलेली आहे. दुसरीकडे एलेनबेरीला थोडा गार प्रतिसाद मिळतोय. अर्थात, ग्रे मार्केट प्रीमियम हा काही निश्चित निर्देशांक नसतो, पण गुंतवणुकीची प्राथमिक दिशा निश्चित करण्यासाठी त्याचा अंदाज लावला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!