5 लाखाचे होतील 10 लाख, 10 लाखाचे होतील 20 लाख; पोस्टाची ‘ही’ भन्नाट योजना तुम्हाला माहिती आहे का?

Published on -

प्रत्येकजण आपल्या भविष्याची चिंता करत असतो. पैसा साठवून तो योग्य पर्यायात गुंतवला तर तो निश्चित फायदेशीर ठरतो. त्यातही आपल्या पैशांची सुरक्षा पाहता, सामान्य लोक पोस्टावर जास्त अवलंबू असल्याचे दिसतात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाची अशी योजना सांगणार आहोत, ज्यात तुमचे पैसे थेट दुप्पट होणार आहे. या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र. काय आहे किसान विकास पत्र हे आपण या बातमीतून पाहू…

कोण उघडू शकते खाते?

भारतातील कोणताही प्रौढ व्यक्ती, किसान विकास पत्रात गुंतवणूक करू शकते. तीन प्रौढ एकत्रितपणे संयुक्त खाते उघडून त्यात पैसे गुंतवू शकतात. याशिवाय, पालक देखील अल्पवयीन किंवा मानसिक आजारी व्यक्तीच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन असेल तर तो स्वतःच्या नावाने या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो.

पैसे दुप्पट कधी होतील?

सध्या किसान विकास पत्र योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिला जात आहे. हा दरवर्षी वाढणारा व्याजदर आहे. या योजनेत जमा केलेले पैसे ११५ महिन्यांत म्हणजेच ९ वर्षे ७ महिन्यांत दुप्पट होतात. तुम्ही या योजनेत किमान १००० रुपये गुंतवू शकता. कमाल मर्यादा नाही. विशेष परिस्थितीत, खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. म्हणजेत तुम्ही 5 लाख गुंतवले तर ते 10 लाख होतील. 10 लाख गुंतवले तर ते 20 लाख होतील.

अर्ज कसा करावा?

पायरी १. किसान विकास पत्रात गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला त्याचा योग्यरित्या भरलेला फॉर्म पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल.
पायरी २. येथे केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. तुम्हाला ओळखपत्र आणि पत्ता पुराव्याची प्रत (पॅन, आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) सादर करावी लागेल.
पायरी ३. यानंतर, कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. तुम्ही रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे जमा करू शकता.
पायरी ४. रोख रकमेच्या बाबतीत, तुम्हाला KVP प्रमाणपत्र ताबडतोब मिळेल. तुम्हाला ते सुरक्षित ठेवावे लागेल कारण तुम्हाला ते मॅच्युरिटीच्या वेळी जमा करावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe