Rules Changing 2024 : नवीन वर्षात होणार हे 7 मोठे बदल ! सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री…

Published on -

Rules Changing 2024 : 2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. लवकरच नवीन वर्ष 2024 सुरु होणार आहे. मात्र नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना 1 जानेवारी 2024 पासून देशात अनके बदल होणार आहेत. काही बदल नागरिकांच्या हिताचे असतील तर काही त्यांना आर्थिक झळ बसवणारे असतील.

1 जानेवारी 2024 पासून देशात अनेक आर्थिक आणि इतर बदल होणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील नवीन नियमांबाबत बाबत माहिती असणे आवश्यक आहे.

1. सुधारित बँक लॉकर करार स्वाक्षरी करा

RBI ने सुधारित बँक लॉकर आणला आहे. सुधारित बँक लॉकर करारावर सही करण्यासाठी RBI ने 31 डिसेंबरपर्यंतच शेवटची मुदत देण्यात आली आहे. जर बँक लॉकर असलेल्या ग्राहकांनी RBI च्या सुधारित बँक लॉकरवर करारावर सही केली नाही तर त्यांचे लॉकर गोठवण्यात येणार आहे.

2. आयटी रिटर्न भरण्याची वेळ

2022-23 (AY 2023-24) या आर्थिक वर्षासाठी आयटी रिटर्न तुमच्याकडे अवघा काही तासांचा वेळ शिल्लक आहे. कारण ३१ डिसेंबरपर्यंत आयटी रिटर्न मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत ITR न भरल्यास तुमच्याकडून 5,000 रुपये दंड आकारला जाईल.

3. डीमॅट खाते, MF मध्ये नामांकन अपडेट करा

तुमचेही डीमॅट खाते किंवा MF मध्ये गुंतवणूक असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. कारण SEBI ने डिमॅट आणि MF खातेधारकांसाठी पुढील वर्षी 30 जूनपर्यंत नामांकनाची अंतिम मुदत वाढवली आहे. ही मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंतच देण्यात आली होती.

4. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फी भरावी लागेल

जर तुम्हालाही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर आजचा करून घ्या. कारण आता आधार कार्ड मोफत ऑनलाईन अपडेट करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतच वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर तुमच्याकडून 50 आकारले जाणार आहेत.

5. निष्क्रिय UPI आयडी बंद होतील

जर तुमच्याकडेही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वापरत नसलेली UPI ID असतील ते बंद करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ UPI वर अॅक्टिव्ह नाहीत ते १ जानेवारीपासून कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत.

6. नवीन सिम कार्ड मिळविण्यासाठी डिजिटल केवायसी प्रक्रिया

तुम्हीही नवीन सिम कार्ड खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता कागदी फॉर्म भरण्याची गरज नाही. आता सिम कार्ड मिळविण्यासाठी आधार-सक्षम डिजिटल केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.

7. कारच्या किमती वाढतील

तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला आर्थिक झळ बसू शकते. कारण मारुती सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि ऑडी सारख्या कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. नवीन वर्षात 1 जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe