7th Pay Commission Breaking : DA वाढीबाबत समोर आली महत्वाची माहिती, मार्चमध्ये कर्मचाऱ्यांचा वाढणार इतका पगार

Ahmednagarlive24 office
Published:
7th Pay Commission Breaking

7th Pay Commission Breaking : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असताना केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करणार आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते. जानेवारी ते जूनमध्ये पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर महिन्यात दुसरी DA वाढ केली जाते.

2024 या वर्षातील पहिली DA वाढ अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र मार्च महिन्यात होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट मिळू शकते. ही DA वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून लागू केली जाईल.

केंद्र सरकार मार्च 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची अपेक्षा आहे. DA मध्ये वाढ केल्यानंतर सरकाकडून DR देखील वाढवला जाऊ शकतो. DA वाढीचा लाभ 48.67 लाख सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र सरकारकडून मागील 4 टक्के DA वाढ करण्यात आली आहे. CPI-IW आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना DA वाढ दिली जात असते. आता मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर त्यांचा DA 50 टक्के होईल.

केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणूक पाहता कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. होळीपूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा लाभ केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार

मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA 50 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के दराने 8,280 रुपये DA दिला जात आहे. DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा DA 9,000 रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe