7th Pay Commission:- कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बाबतीत अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला विषय म्हणजे महागाई भत्ता होय. या महागाई भत्त्याचा फायदा हा कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीवर आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनच्या वाढीत आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शन धारक हे महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या सणासुदीचे दिवस आणि त्यातल्या त्यात दिवाळी अगदी तोंडावर आलेली असताना देशातील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकार एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. हे गिफ्ट म्हणजे जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीतील महागाई भत्यात सरकार तीन टक्क्यांची वाढ करू शकते.
महागाई भत्त्यात होईल 3% ची वाढ?
मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर केंद्र सरकार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना महागाई भत्ता वाढीची मोठी भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 55% इतका महागाई भत्ता मिळत असून त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली जाईल व महागाई भत्ता हा 58% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली तर त्याचा फायदा देशातील एक कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.

साधारणपणे नवरात्रीनंतर आणि दिवाळी सणाच्या अगोदर महागाई भत्ता वाढीसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही. परंतु आधीच्या वर्षाप्रमाणे नवरात्रीनंतर आणि दिवाळीच्या आधी ही घोषणा होईल अशी शक्यता आहे. कारण बरेच वर्ष सरकारने याच कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा केलेली आहे.
पगार आणि पेन्शनमध्ये किती होईल वाढ?
सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना जो काही महागाई भत्ता दिला जातो तो कर्मचाऱ्यांना मिळणारी बेसिक सॅलरी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणारी बेसिक पेन्शन या हिशोबाने दिला जातो. महागाई भत्त्यात जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर 58% पर्यंत महागाई भत्ता होईल. यामध्ये समजा एखाद्या निवृत्तीवेतनधारकाला 9 हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर आता मिळणाऱ्या 55% महागाई भत्त्याच्या हिशोबाने त्याला 4950 रुपये एक्स्ट्रा मिळत आहेत व जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर 5220 रुपये एक्स्ट्रा मिळतील.
म्हणजेच एकूण पेन्शनमध्ये महिन्याला 270 रुपयांची वाढ होईल. तसेच दुसरे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 18000 रुपये असेल तर आता मिळणाऱ्या 55% महागाई भत्ता हा 9900 रुपये मिळत आहे. जर त्याच्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होऊन 58% महागाई भत्ता झाला तर कर्मचाऱ्याला दहा हजार चारशे चाळीस रुपये मिळतील. म्हणजेच अगोदर पेक्षा त्याच्या पगारात 540 रुपयांची वाढ होईल.