7th Pay Commission DA Hike : गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची चर्चा होत आहे. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली नाही. मात्र आता कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्ट रोजी मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
AICPI कडून गेल्या सहा महिन्यांची म्हणजेच जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के DA वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे.
AICPI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूनचा निर्देशांक 136.4 अंकांवर पोहोचला आहे तर मे महिन्याचा निर्देशांक 134.7 अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढून 46 टक्के होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
DA 46 टक्क्यांपर्यंत वाढणार?
कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ सरकारकडून केली जाऊ शकते. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना ही DA वाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
वर्षातून 2 वेळा DA वाढतो
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते. दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात येते. पहिली महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जून आणि दुसरी महागाई भत्ता वाढ जुलै डिसेंबर महिन्यामध्ये करण्यात येत असते.
सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होणार
केंद्र सरकारकडून 15 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ दिली जाऊ शकते. या महागाई भत्ता वाढीचा फायदा 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
2023 या वर्षांमध्ये मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. तसेच पुढील महागाई भत्ता देखील 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होऊ शकतो.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या तिजोरीवर 12,815.60 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील बंपर वाढ होईल.