7th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या बाबतीत जर आपण बघितले तर महागाई भत्ता तसेच वेतन आयोग, विविध प्रकारचे मिळणारे भत्ते हे मिळणाऱ्या वेतनाशी संबंधित असल्याने कर्मचारी याबाबत सरकारकडून केल्या जाणाऱ्या घोषणांची आतुरतेने वाट पाहत असतात.
यामध्ये महागाई भत्ता हा अतिशय महत्त्वाचा असून सध्या कर्मचाऱ्यांना 55% इतका महागाई भत्ता मिळत आहे. परंतु आता या मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता असून यामध्ये साधारणपणे तीन टक्क्यांची वाढ होईल अशी माहिती समोर आलेली आहे. चला तर मग यासंबंधीची ताजी अपडेट आपण बघू.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा अर्थात डीआरमध्ये होणार 3 टक्क्यांची वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई दिलासा अर्थात डीआरच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता आणि महागाई दिलासा यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची दाट शक्यता असून केंद्र सरकारच्या माध्यमातून या संबंधीची लवकरच घोषणा होऊ शकते.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याविषयीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण जर आपण सरकारचा अगोदरचा ट्रेंड पाहिला तर दरवर्षी दिवाळीच्या अगोदर सरकार महागाई भत्याविषयीचा निर्णय घेत असते.
महागाई भत्ता होणार 58%?
सध्या केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना साधारणपणे 55% इतका महागाई भत्ता देण्यात येत आहे. यामध्ये आता तीन टक्के वाढ केली जाण्याची शक्यता असून तो 58% पर्यंत जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वाढ जुलै 2025 पासून लागू होईल अशी एक शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे या काळात तीन महिन्यांची थकीत रक्कम म्हणजेच एरियर्स देखील ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की, वर्षातून दोनदा सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
साधारणपणे जानेवारी व जूनसाठी होळी पूर्वी महागाई भत्ता जाहीर होतो.तर दुसरी वाढ ही जुलै-डिसेंबरसाठी असते व ती साधारणपणे दिवाळीपूर्वी घोषित केली जाते. यावर्षी 20 ते 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे व त्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्यासंबंधी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगांतर्गत होणारी महागाई भत्त्यातली ही वाढ शेवटची असणार आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे.