7th Pay Commission : महाराष्ट्रातील (Maharashtra) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) मोठी खुशखबर असून मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने (Shinde Govt) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (State Government Employees) महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे.
17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्यात केलेले बदल ऑगस्टपासून लागू होतील.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर महागाई भत्ता (डीए वाढ) आता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
छत्तीसगड सरकारनेही आनंदाची बातमी दिली आहे
यापूर्वी छत्तीसगड सरकारनेही राज्यातील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देत महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर छत्तीसगडमधील सरकारी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
याचा फायदा 3.8 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी 7 व्या वेतन आयोगांतर्गत 22 टक्के आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत 174 टक्के महागाई भत्त्याचा लाभ घेत होते.
1 ऑगस्ट 2022 पासून नवीन DA लागू
सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या बदलांमुळे, 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात 6 टक्के आणि 6 व्या वेतन आयोगांतर्गत 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे
दुसरीकडे, केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलैमध्ये वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो.
जानेवारी महिन्याचा महागाई भत्ता सरकारने मार्चमध्ये जाहीर केला होता. त्यावेळी महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला होता. यावेळी जुलै महिन्यातील महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.