7th Pay Commission: 2024 च्या लोकसभा निवडणूका पाहता केंद्र सरकार येणाऱ्या काही दिवसात तब्बल 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याची तयारी करत असल्याची सध्या मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार या महिन्यात (फेब्रुवारी 2023 ) मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो यापूर्वी केंद्र सरकारने 28 सप्टेंबर 2022 रोजी कर्मचाऱ्यांचा भत्ता 34 वरून 38 टक्के केला होता. आता सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, त्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.
भत्त्यात 4 टक्के वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तयारी करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग डीएमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करणार आहे. यापूर्वी 28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. पण नियमानुसार, महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारीत महागाई भत्ता वाढवला जाणार होता. पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. आता सरकार कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी हा गिफ्ट देण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा प्रकारे गणना केली जाते
तज्ञांच्या मते, औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या आधारावर महागाई भत्ता मोजला जातो. त्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला जातो. ही प्रक्रिया वर्षातून दोनदा पूर्ण केली जाते. माहितीनुसार, या निर्देशांकानुसार, महागाई भत्त्यात 4.21 टक्के वाढ मोजण्यात आली आहे.
अर्थसंकल्पानंतर, वित्त मंत्रालयाचा खर्च विभाग डीएमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करेल, त्यानंतर सरकार वाढीव डीए जाहीर करेल. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करून दिला आहे.
हे पण वाचा :- Unlucky Signs In House: नागरिकांनो ! घरात दिसले यापैकी एखादे अशुभ चिन्ह तर समजून घ्या वाईट दिवस येणार