केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज असून केंद्र सरकार पुढील महिन्यांमध्ये महागाई भत्ता अर्थात डीए मध्ये वाढ करणार आहे. एवढेच नाही तर आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा एचआरए देखील वाढणार आहे. सध्या विचार केला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के याप्रमाणे महागाईभत्ता मिळत असून मीडिया रिपोर्ट नुसार घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील आता वाढवला जाणार असल्याचे समोर आलेले आहे. याबाबतीत सरकार नियोजन करत असून याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काही महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये दिसून येणार आहे.
लवकरच एचआरए वाढण्याची शक्यता
केंद्र सरकार लवकरच एचआरए देखील वाढू शकते. महत्वाचे म्हणजे याकरिता केंद्र सरकारने यापूर्वीच अधिसूचना जारी केली असून काही मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकार 2023-24 या आर्थिक वर्षाच्या शेवटी घर भाडे भत्ता अर्थात एचआरए वाढवण्याची शक्यता आहे. कारण तेव्हाच महागाई भत्ता हा 50% पर्यंत पोहोचू शकतो. जर महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला तर अशावेळी सरकार एच आर ए मध्ये सुधारणा करू शकते.
सध्या महागाई भत्ताचा विचार केला तर तो 42 टक्के इतका असून जुलैमध्ये यात पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. घर भाडे भत्ता अर्थात एचआरएचा विचार केला तर याआधी जुलै 2021 मध्ये सुधारणा करण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता 25% च्या पुढे गेला होता. त्यावेळी सरकारला एच आर ए मध्ये सुधारणा करता आली होती. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील चांगली वाढ झाली होती. त्यामुळे जेव्हा आता महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा एच आर ए मध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे.
किती वाढू शकतो एचआरए?
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी केंद्र सरकार घरभाडे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे. सध्या हा घर भाडे भत्ता सत्तावीस टक्के या दराने कर्मचाऱ्यांना मिळत असून यामध्ये जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर तो 30% पर्यंत वाढणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जेव्हा पोहचेल तेव्हा एच आर ए अर्थात घरभाडे भत्ता 30 टक्के होईल.