7th Pay Commission Update : देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या १४व्या हफ्त्याचे पैसे जमा केले आहेत. आता शेतकऱ्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी दिली जाऊ शकते.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. तसेच महागाई भत्त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या अनेक भत्त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पहिली महागाई भत्ता वाढ मार्च २०२३ मध्ये केली होती. यामध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्यांना दुसरी DA वाढ आणि अंक भेटवस्तू दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
DA-DR मध्ये वाढ
केंद्र सरकारकडून त्यांच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढ आणि DR वाढ दिली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता ४ टक्के वाढ दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्के होऊ शकतो.
घरभाडे भत्त्यात वाढ
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढ देखील दिली जाऊ शकते. जुलै २०२१ मध्ये केंद्र सरकारकडून घरभाडे भत्ता वाढ दिली होती. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा ३ टक्के HRA वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना DA आणि HRA वाढीसोबत फिटमेंट फॅक्टर देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. कारण कर्मचारी संघटनांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली जावी अशी मागणी केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळत आहे, मात्र तो 3.68 पर्यंत वाढवावा, अशी त्यांची मागणी होत आहे.
डीएच्या थकबाकीचेही पैसे मिळू शकतात
कोरोना काळात कर्मचाऱ्यांचा DA थकला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून कोरोना काळातील कर्मचाऱ्यांच्या DA थकबाकीबाबत विचार केला जाऊ शकतो. तसेच DA वाढीमध्ये त्याची सुधारणा देखील केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांचा १८ महिन्यांचा DA थकबाकी आहे. अनेकदा DA थकबाकी देण्यासाठी सरकारने नकार दिला आहे मात्र आता सरकारकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.