Indian Bank FD Scheme | भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कपात होण्याची शक्यता लक्षात घेता, अनेक बँका सध्या त्यांच्या एफडी योजनांमध्ये बदल करत आहेत. अशातच इंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या बँकेने आपल्या दोन विशेष एफडी योजनांची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. पूर्वी या योजनांची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत होती. या निर्णयामुळे अनेक गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
इंड सुपर 400 डेज
इंड सुपर 400 डेज ही इंडियन बँकेची सर्वाधिक चर्चेत असलेली एफडी योजना आहे. या योजनेअंतर्गत फक्त 400 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 7.30%, ज्येष्ठ नागरिकांना 7.80% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 8.05% व्याज दिलं जातं. ही योजना कमी कालावधीमध्ये जास्त परतावा देणारी असल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरते.

या योजनेत 10,000 रुपयांपासून ते 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. नियमित एफडीच्या तुलनेत, ही योजना कमी वेळेत चांगला परतावा देते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 0.50% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 0.15% अधिक व्याज मिळतं.
इंडियन सुप्रीम 300 डेज
इंडियन बँक सध्या आणखी दोन विशेष एफडी योजना देत आहे. इंडियन सुप्रीम 300 डेज ही योजना 300 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 7.05%, ज्येष्ठ नागरिकांना 7.55% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याज देते. ही योजना 20 जून 2025 पर्यंत खुली आहे.
इंडियन ग्रीन डिपॉझिट 555
दुसरी योजना म्हणजे इंडियन ग्रीन डिपॉझिट 555 डेज. या योजनेत 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि व्याजदर सामान्यांसाठी 6.80%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30%, तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.55% आहे.
इंडियन बँकेने दिलेले व्याजदर सर्वसामान्यांपासून अति ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लक्षात घेऊन ठरवले आहेत. मुदतीनुसार ठेवींसाठी व्याजदर 2.80% पासून सुरू होऊन 7.30% पर्यंत जातात, तर विशेष योजनांमध्ये 8.05% पर्यंत परतावा मिळतो. ही वेळ योग्य आहे एफडीद्वारे स्थिर परतावा मिळवण्याची.