काय म्हणता! 8 व्या वेतन आयोगामुळे किमान मूळ पेन्शन 9000 रुपयांवरून होईल 25,740 रुपये; कसे राहील गणित?

देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील गेल्या कित्येक दिवसापासूनची मागणी होती व नुकतीच सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाला आता मंजुरी देण्यात आली.

Ratnakar Ashok Patil
Published:
8th pay commission

8th Pay Commission:- देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील गेल्या कित्येक दिवसापासूनची मागणी होती व नुकतीच सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाला आता मंजुरी देण्यात आली.

त्यामुळे जेव्हापासून आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फरक आपल्याला दिसून येणार आहे व हा फरक कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदा देणारा ठरणार आहे.

सरकारने केलेल्या गोष्टीनुसार बघितले तर आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे व त्याचा थेट फायदा एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर आठवा वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.86 असण्याची शक्यता आहे

व फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीसाठी व पेन्शनमधील वाढीकरिता खूप महत्त्वाचा असा घटक असतो. त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर 2.86 झाला तर निवृत्तीवेतनधारकांची मूळ पेन्शन 9000 रुपये वरून थेट 25 हजार 740 रुपये होईल.

कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाकडून काय आहेत अपेक्षा?
जसे आपण बघितले की,फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांची पगार आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आवश्यक असलेली पेन्शन यामध्ये वाढ ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे व या माध्यमातूनच नवीन पगाराची गणना देखील केली जाते. सातव्या वेतन आयोगाने 2.57 चा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला होता व त्यामुळे वेतन व पेन्शनमध्ये घसघशीत अशी वाढ झालेली होती

व आता आठव्या वेतन आयोगासाठी हा फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढवला जाईल अशी एक अपेक्षा आहे. 2.86 फिटमेंट फॅक्टर जर स्वीकारण्यात आला तर निवृत्ती वेतनधारकांच्या सध्याच्या 9000 रुपये किमान पेन्शनमध्ये वाढ होऊन ती दरमहा 25 हजार 740 रुपयापर्यंत वाढू शकते.

तसेच कमाल पेन्शनमध्ये सध्याच्या एक लाख 25 हजार रुपयांवरून थेट 357,500 पर्यंत वाढ होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे या सुधारित पेन्शनवर महागाई सवलत म्हणजेच डीआर देखील जोडला जाईल व त्यामुळे पेन्शनधारकांना खूप जास्त फायदे मिळतील.

कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांमध्ये होईल का सुधारणा?
आठव्या वेतन आयोगामध्ये इतर पेन्शन संबंधित लाभामध्ये सुधारणा देखील अपेक्षित आहेत व या सुधारणांमध्ये प्रामुख्याने महागाई पासून दिलासा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून नवीन पेन्शन रचनेवर सुधारणा अपेक्षित आहेत.

इतकेच नाही तर रिविजन पेन्शन वाढीनुसार फॅमिली पेन्शनमध्ये देखील वाढ करता येते. ग्रॅच्युईटीच्या कमाल मर्यादेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगामध्ये प्रस्तावित 2.86 फिटमेंट फॅक्टर पेन्शनमध्ये 186 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते.

त्यासोबतच महागाई सवलत आणि इतर भत्त्यांमधील सुधारणा पेन्शनधारकांची आर्थिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्यासाठी फायद्याची ठरते.त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe