एकदा केलेली 5 ते 6 लाखाची गुंतवणूक देईल तुम्हाला दिवसाला 3 ते 4 हजार रुपये पर्यंत कमाई! जाणून घ्या भन्नाट व्यवसाय बद्दल

तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल व तुमच्याकडे पाच ते सहा लाखापर्यंत गुंतवणूक करू शकाल इतका पैसा असेल तर अनेक चांगले व्यवसाय तुम्ही उभारू शकतात व या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवू शकतात. व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कुठल्याही व्यवसायाची निवड करू शकतात.

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea:- तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल व तुमच्याकडे पाच ते सहा लाखापर्यंत गुंतवणूक करू शकाल इतका पैसा असेल तर अनेक चांगले व्यवसाय तुम्ही उभारू शकतात व या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवू शकतात. व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कुठल्याही व्यवसायाची निवड करू शकतात.

व्यवसायांच्या यादीमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून देखील चांगला नफा मिळेल असे अनेक व्यवसाय आहेत. याउलट लाखो रुपयांच्या गुंतवणुकीतून आयुष्यभर उत्तम पैसा मिळवता येईल असे देखील व्यवसाय आहेत.

या अनुषंगाने तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा आहे व काही लाख रुपये टाकायची क्षमता तुमच्यात आहे तर तुम्ही या लेखात दिलेल्या व्यवसायाचा विचार करू शकतात. कारण हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला लाखो रुपये कमवून देईल अशा प्रकारचा व्यवसाय आहे.

कॉर्न फ्लेक्स म्हणजेच मक्याचे वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय बनवेल तुम्हाला वर्षातच लखपती
हा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण आणि फायद्याचा असा व्यवसाय आहे व विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे प्रशिक्षण घेण्याची गरज भासत नाही. योग्य पद्धतीने नियोजन करून व मार्केटिंग स्किलचा वापर करून तुम्ही महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत पैसे माध्यमातून कमवू शकतात.

कॉर्नफ्लेक्स म्हणजेच मक्याचे वेफर्स हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व मक्याची कणसे याकरिता प्रामुख्याने लागतात. मक्याच्या कणसांचा वापर हा घरी किंवा हॉटेलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो व आरोग्यासाठी देखील ते चांगले मानले जातात.

त्यामुळे या दृष्टिकोनातून कॉर्न फ्लेक्स म्हणजेच मक्याचे वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय हा खूप मोठा फायद्याचा ठरू शकतो. तुम्हाला जर हा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे. जेणेकरून या जागेवर तुम्ही कॉर्नफ्लेक्स बनवण्याचा प्लांट उभारू शकतात.

तसेच तयार माल ठेवण्यासाठी तुम्हाला स्टोरेज देखील लागेल व याकरता देखील तुम्हाला जागेची आवश्यकता भासेल. प्लांट आणि स्टोरेज याकरिता 2000 ते 3000 स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कच्चामाल आणि जीएसटी नंबर, विज जोडणी इत्यादी तुमच्या आवश्यकता यामध्ये असते.

कॉर्नफ्लेक्स बनवणारी यंत्रांचा वापर करून गहू आणि तांदळाचे फ्लेक्स देखील बनवता येतात
या व्यवसायामध्ये तुम्ही जे काही यंत्रसामग्री वापरणार आहात त्यांचा वापर फक्त कॉर्नफ्लेक्स तयार करण्यासाठी नाही होत तर त्यापासून गहू आणि तांदळाचे फ्लेक्स देखील तयार करता येऊ शकतात. त्यामुळे दुहेरी फायदा या माध्यमातून होतो. ज्या ठिकाणी मक्याचे सगळ्यात जास्त उत्पादन होते अशा परिसरामध्ये हा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरते.

तुम्ही काही अंतरावरून मका आणून जर त्याचे कॉर्नफ्लेक्स बनवले तर तुमचा उत्पादन खर्च वाढू शकतो. त्यामुळे अशी जागा शोधावी की त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा मका तुम्हाला जागेवर मिळेल किंवा तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला विकत घेता येईल.

कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो?
जर आपण काही मिडिया रिपोर्ट्स बघितले तर त्यानुसार एक किलो कॉर्न फ्लेक्स म्हणजेच मक्याचे वेफर्स बनवण्याकरिता 30 रुपये खर्च येतो. परंतु जेव्हा तुम्ही बाजारात एक किलो फ्लेक्स विकतात तेव्हा ते 70 रुपये किलो दराने सहजपणे विकले जाते.

अशाप्रकारे तुम्ही तुमची मार्केटिंग स्किल वापरून एका दिवसाला शंभर किलो कॉर्नफ्लेक्स विकले तर एका दिवसांमध्ये तुम्ही खर्च वजा जाता चार हजार रुपयांचा नफा मिळवू शकतात व महिन्याला एक लाख रुपयापर्यंत सहज कमाई करण्याची संधी या माध्यमातून मिळते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमी पाच ते सहा लाखांची गुंतवणूक करता येऊ शकते व छोट्या स्तरावर सुरुवात करायची असेल तर यापेक्षा कमी पैसा लागेल.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुद्रा योजनेचा फायदा घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. समजा तुमच्याकडे पन्नास हजार ते एक लाख रुपये असतील तर ते पैसे गुंतवून तुम्ही बाकीचे पैसे कर्जाच्या रूपाने देखील उभा करू शकतात व हा व्यवसाय सुरू करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe