Post Office Scheme:- गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या छोट्या बचत योजना अतिशय महत्त्वाच्या व लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीची सुरक्षितता आणि निश्चित हमी परतावा या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या योजनांना अतिशय महत्त्व दिले जाते. या योजनांमध्ये तुम्ही सातत्यपूर्ण आणि दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करत गेलात तर तुमची छोटीशी बचत लाखो रुपयांमध्ये रूपांतरित झाल्याचे दिसून येते. अशाप्रकारे तुम्हाला जर छोट्या छोट्या बचतीतून गुंतवणूक सुरू करायची असेल व त्यातून लाखो रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर तुमच्याकरिता पोस्ट ऑफिसची आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट स्कीम अतिशय फायदयाची ठरू शकते. ही योजना तुम्हाला छोट्याशा प्रमाणात गुंतवणूक करायला प्रोत्साहन देते. चला तर मग या लेखात या योजनेची माहिती थोडक्यात बघू.
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमची वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी एक अतिशय फायद्याची योजना असून यामध्ये तुम्ही छोट्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता व कालांतराने लाखो रुपये मिळवू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी हा पाच वर्षांचा असून त्यामध्ये तुम्ही परत पाच वर्षांकरता वाढ करू शकतात. जरा यातील गुंतवणुकीचे स्वरूप जर आपण समजून घेतले तर महिन्याला दहा हजारांची गुंतवणूक पाच वर्षांसाठी केली तर तुमची एकूण जमा होणारी रक्कम सहा लाख रुपये आणि त्यावर 6.7 टक्के दराने मिळणारे व्याज मिळून तुम्हाला मिळतील 1 लाख 13 हजार व असे एकूण तुमची रक्कम होते सात लाख 13 हजार रुपये.परंतु ही योजना तुम्ही परत पाच वर्षांकरिता वाढवली तर पुढील पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये होते व या 12 लाखावर तुम्हाला 6.7 टक्के दराने 5.8 लाख रुपये परतावा मिळतो. अशाप्रकारे दहा वर्षात तुमचे एकूण या योजनेत साधारणपणे 17 लाख 8 हजार रुपये जमा होतात. अशाप्रकारे तुम्ही नियमित गुंतवणूक केली तर या माध्यमातून तुम्हाला 17 लाख रुपये कमवता येतात.
