Share Market Tips : केंद्रातील सरकारने अलीकडेच देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी जीएसटी कपातीची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर जीएसटी दरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सरकारने विविध प्रॉडक्ट वरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या महागाईने बेजार सर्वसामान्य जनतेसाठी सरकारचा हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. या निर्णयाची 22 सप्टेंबर पासून अंमलबजावणी होणार आहे.
दरम्यान जीएसटी ची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेअर मार्केट मधील काही स्टॉक गुंतवणूकदारांना येत्या काळात चांगले रिटर्न मिळवून देणार आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फॉर्म जेपी मॉर्गनने गुंतवणूकदारांना असे टॉप पाच स्टॉक सुचवले आहेत जे की येत्या काळात चांगली कामगिरी करताना दिसतील.

हे स्टॉक देतील जबरदस्त परतावा
जेपी मॉर्गनने थर्मॅक्सच्या (Thermax) शेअर्स साठी 3,869 रुपये टारगेट प्राईस ठेवली आहे. आज हा स्टॉक 3,368.50 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. या हिशोबाने या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज ब्रोकरेज कडून देण्यात आला आहे. कमिन्स इंडियाच्या शेअर्समध्ये पण येत्या काळात चांगली सुधारणा दिसू शकते. या कंपनीचे शेअर सध्या चार हजार सोळा रुपयांवर ट्रेड करतोय पण येत्या काळात हे शेअर्स 4649 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे या स्टॉकच्या किमती 16 टक्क्यांनी वाढतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
सीजी पॉवरसाठी पण ब्रोकरेज जेपी मॉर्गन बुलिश आहे. ब्रोकरेजने सीजी पावरचे शेअर्स नऊ टक्क्यांनी वाढणार असा अंदाज दिला आहे. आज हा स्टॉक 768.60 रुपयांवर ट्रेड करतोय पण येत्या काळात याची किंमत 840 रुपयांपर्यंत जाऊ शकते. अर्थात यातून गुंतवणूकदारांना येत्या काळात 9% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात. एबीबी इंडियाला टॉप ब्रोकरेज कडून न्यूट्रल रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉकच्या किमतीत नऊ टक्क्यांची वाढ होणार असा अंदाज आहे. आज 5175 रुपयांवर ट्रेड करणारा हा स्टॉक येत्या काळात 5639 रुपयांवर ट्रेड करेल असा विश्वास ब्रोकरेजने व्यक्त केला आहे.