सोने हा आवडता प्रकार असला तरी आता सोने घेणे सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. अहिल्यानगरमध्ये गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला होता. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली. यामुळे सराफ व्यवसायिकांना अपेक्षीत व्यवसाय करता आली नाही, असा दावा सुवर्णकार संघटनेच्यावतीने करण्यात आला.
तर सुवर्ण बाजारपेठेऐवजी ग्राहकांनी अन्य खरेदीला पंसती दिल्याचे चित्र नगरमध्ये होते. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा उत्साहात पार पडला. यावेळी घरोघरी नागरिकांनी आनंदाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. यंदा चैत्रारंभापूर्वीच महागाईचा पारा तापला असला तरी मुहूर्ताची खरेदी म्हणून ग्राहकांचे घर, वाहन, गॅझेट्स वा विद्युत उपकरणे तसेच सोने-चांदीसारख्या मैल्यवान धातूबाबतचे आकर्षण यंदाही होते.

मात्र, त्याला वाढलेल्या दराची व महागाईची किनार होती. गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ झटकून खरेदीच्या माध्यमातून वसंत ऋतूच्या आगमनाला ग्राहकवर्ग सज्ज असल्याचे काल दिसून आले. यावेळी वाढत्या खरेदीमुळे विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. यावेळी अनेकजण नवीन वाहन खरेदी केली. यामुळे कार शोरूम, दुचाकी विक्री केंद्रांवर ग्राहकांची गर्दी होती.
कंपन्यांनी विविध प्रकारच्या सूट योजना जाहीर केल्या, यात फ्री इन्शुरन्स, एक्स्चेंज बोनस आणि झिरो डाऊन पेमेंटसारख्या लाभामुळे खरेदीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मोबाइल, लॅपटॉपप्रेमी ग्राहकांसाठी गुढीपाडवा हा नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, इयर इक्विपमेंट, स्मार्ट टीव्ही, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याचा उत्तम दिवस मानला जातो.
उन्हाचा हंगाम पाहता एसी, फ्रीजसाठीही ग्राहकांकडून चाचपणी सुरू होती. अनेकांनी मुहुर्तावर विविध खरेदी केली. मात्र, यंदा सोने-चांदीच्या बाजारपेठेला दरवाढीचा मोठा फटका असल्याचा दावा सराफ संघटनेकडून करण्यात आला. गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी ५० ते ५५ हजार तोळा असणारे सोने खरेदीसाठी आता ९२ हजार रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांनी आवश्यकते पेक्षा अधिक खरेदीवर मुरड घातल्याचे दिसून आले.
यामुळे यंदा पाडव्याच्या मुर्हजावर नगरच्या बाजारपेठेत अपेक्षीत उलाढाल होवू शकली नाही. नगरमध्ये काल मुहूर्तावर २४ कॅरेट सोन्याचे दर हे ९२ हजार होते. तर २२ कॉरेट सोने हे ९० हजार रुपये प्रती तोळा होते. यामुळे ग्राहकांनी सोने-चांदीऐवजी अन्य खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले