Ajax Engineering IPO साठी 13 फेब्रुवारी पर्यंत लावा बोली, घ्या 629 मध्ये शेअर आणि मिळवा लाखोत परतावा

अजाक्स इंजिनिअरिंग लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ 10 फेब्रुवारी 2025 रोजी उघडणार आहे. या IPO मधून कंपनीने 1,269.35 कोटी उभारण्याचा उद्देश ठेवला असून या इश्यूसाठी कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 1,269.35 कोटी किमतीचे 2,01,80,446 शेअर्स विकत आहेत.

Published on -

IPO GMP:- अजाक्स इंजिनिअरिंग लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ 10 फेब्रुवारी 2025 रोजी उघडणार आहे. या IPO मधून कंपनीने 1,269.35 कोटी उभारण्याचा उद्देश ठेवला असून या इश्यूसाठी कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 1,269.35 कोटी किमतीचे 2,01,80,446 शेअर्स विकत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या IPO मध्ये कंपनी कोणतेही नवीन शेअर्स जारी करत नाही. या IPO मध्ये 13 फेब्रुवारीपर्यंत बोली लावता येईल आणि शेअर्स 17 फेब्रुवारी 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहेत.

किती आहे प्राईस बँड?

कंपनीने या IPO साठी प्राइस बँड 599 ते 629 प्रति शेअर निश्चित केला आहे. गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 23 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. जर तुम्ही 629 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर एक लॉट (23 शेअर्स) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमची किमान गुंतवणूक 14,467 असेल.

याशिवाय किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 299 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. या एकूण गुंतवणुकीची रक्कम 1,88,071 असेल. या IPO मध्ये 35% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. 50% हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी आणि उर्वरित 15% हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

या कंपनीची स्थापना कधी झाली?

अजाक्स इंजिनिअरिंग लिमिटेडची स्थापना 1992 मध्ये झाली आणि कंपनी काँक्रीट उपकरणे निर्माण करते.यामध्ये सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सर, बॅचिंग प्लांट्स, ट्रान्झिट मिक्सर, बूम पंप, काँक्रीट पंप,

स्लिप-फॉर्म पेव्हर्स आणि 3D काँक्रीट प्रिंटर यांचा समावेश आहे. कंपनी भारतभर 23 राज्यांमध्ये 51 डीलरशिप्सद्वारे सेवा पुरवते.ज्यातून 114 ठिकाणी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा प्रदान केली जाते. या उत्पादनांमुळे कंपनीने भारतीय बाजारात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे.

IPO म्हणजे काय?

याबाबत सांगायचं तर, जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच सामान्य लोकांना शेअर्स जारी करते.तेव्हा त्याला “इनिशियल पब्लिक ऑफरिंग” अर्थात आयपीओ म्हणतात.

कंपनी बाजारातून पैशांचा उभारणी करण्यासाठी आपल्या शेअर्सची विक्री करते. यामुळे कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक निधी मिळवता येतो. IPO मध्ये गुंतवणूक करून लोक कंपनीच्या भविष्यातील विकासाचा आणि वाढीचा भाग होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe