HDFC Bank Update : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट! आजपासून बंद होणार ही सेवा…

Content Team
Published:
HDFC Bank UPI Latest Update

HDFC Bank UPI Latest Update : जर तुम्ही  खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने नुकतेच जाहीर केले आहे की ते कमी-मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी मेसेज पाठवणे थांबवणार आहेत.

HDFC बँकेच्या ग्राहकांना 25 जूनपासून 100 रुपयांपेक्षा कमी UPI पेयमेंटसाठी मेसेज मिळणार नाही, बँक फक्त 500 ​​रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास एसएमएस पाठवणार आहे. तथापि, ग्राहकांना ईमेलद्वारे सूचना मिळत राहतील. मात्र त्यासाठी बँकेने ग्राहकांना त्यांचे ईमेल अपडेट करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून त्यांना सूचना मिळत राहतील.

बँकेच्या ज्या ग्राहकांनी त्यांचा ईमेल आयडी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्याशी लिंक केलेला नाही ते अलर्ट मिळविण्यासाठी ईमेल आयडी अपडेट करू शकतात.

अशा प्रकारे अपडेट करा ईमेल आयडी

सर्व प्रथम https://www.hdfcbank.com/ वर जा.

-यानंतर Insta Service या पर्यायावर क्लिक करा.

-आता मेनू खाली स्क्रोल करा आणि अपडेट ईमेल आयडीचा पर्याय शोधा.

-यानंतर लेट्स बिगिन वर टॅप करा.

-आता बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.

-यानंतर डीओबी, पॅन किंवा ग्राहक आयडी टाका.

-आता Get OTP वर टॅप करा.

-आता OTP प्रविष्ट करा आणि पुढील सूचनांचे अनुसरण करा.

रिअल टाइम पेमेंट सिस्टम म्हणजे काय?

UPI ही एक रिअल टाइम पेमेंट (HDFC बँक UP ट्रान्झॅक्शन अपडेट) प्रणाली आहे. UPI पेमेंट प्रणाली भारतात 2016 मध्ये सुरू झाली. UPI प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ऑपरेट केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe