Post Office Scheme:- तुम्ही देखील तुमच्या समृद्ध आणि उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये आपण अशा एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत जी दरवर्षी थोडी गुंतवणूक करून तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते. ही एक सरकारी योजना असून यात तुम्ही केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहील व तुम्हाला रिटर्न देखील जास्त मिळतील. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना असून त्या योजनेचे नाव आहे पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना होय.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेचे वैशिष्ट्ये
ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाणारी सरकारी योजना असून गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. या योजनेचा परिपक्वता कालावधी म्हणजेच मॅच्युरिटी पीरियड हा पंधरा वर्षाचा आहे.म्हणजे तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला ती पंधरा वर्षांपर्यंत करावी लागते. या योजनेत वार्षिक 7.1% परतावा मिळतो. गुंतवणुकीची मर्यादा बघितली तर पाचशे रुपयांपासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व कमाल दीड लाख रुपये यामध्ये तुम्ही गुंतवू शकतात. तुम्ही गुंतवणूक सुरू केली व या योजनेला पंधरा वर्षे पूर्ण झाले व तुम्हाला पैसे काढायचे नसतील तर तुम्ही परत दोनदा पाच वर्षांकरिता या योजनेची मुदत वाढवू शकता. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही पंचवीस वर्षे या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन देखील अर्ज करू शकतात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील तुम्हाला अर्ज करता येतो.

कसा मिळू शकतो सहा लाख रुपयांचा परतावा?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेमध्ये तुम्ही वर्षाला 50 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली व गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवत 15 वर्षांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत गेलात तर तुमची एकूण गुंतवणूक सात लाख 50 हजार रुपये होते व पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकूण 13 लाख 56 हजार 70 रुपये मिळतात. या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की पंधरा वर्षात आपल्याला सहा लाख सहा हजार सत्तर रुपयांचा नफा होतो. तसेच तुम्ही पंधरा वर्षासाठी महिन्याला 1 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षात तुमचे एक लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक होते. यावर तुम्हाला 7.1% दराने जर परतावा मिळाला तर तुम्हाला पंधरा वर्षानंतर एकूण तीन लाख पंधरा हजार रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला 1.45 लाख रुपयांचा नफा या माध्यमातून मिळतो.