Annuity Plan : तुम्हालाही करायची असेल Annuity Plan मध्ये गुंतवणूक तर जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट पर्याय कोणता

Ahmednagarlive24 office
Published:
Annuity Plan

Annuity Plan : आपल्या सुरक्षित भविष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. परंतु अनेकांना कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी ते समजत नाही, त्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळत नाही. गुंतवलेले पैसे आणि वेळही वाया जातो.

अशातच जर तुम्हालाही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर बातमी शेवटपर्यंत नीट वाचा. तुम्ही आता Annuity Plan मध्ये गुंतवणूक करू शकता. कारण यामध्ये इतर योजनापेक्षा चांगला फायदा मिळतो. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर.

असे अनेक लोक आहेत ज्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या आयुष्यासाठी सुरक्षित तसेच नियमित उत्पन्न मिळवायचे आहे. असे असल्याने त्यांना अॅन्युइटी स्कीममध्ये खूप रस असतो. परंतु, अजूनही असे कितीतरी लोक आहेत ज्यांना या योजनेची काहीच माहिती नाही. त्यांना याबाबत खूप गोंधळ आहे.

हे लक्षात घ्या की कोणत्याही व्यक्तीला अॅन्युइटी प्लॅनमध्ये थेट रक्कम गुंतवता येते. या योजनेचा वापर करून, त्या व्यक्तीला आयुष्यभर ठराविक वेळेच्या अंतराने नियमित उत्पन्न मिळत असते. खरं तर, तुम्ही या प्लॅनमध्ये गुंतवणाऱ्या फंडातून परतावा मिळत राहतो. मग ते गुंतवणूकदारांना हप्त्यांमध्ये विभागण्यात येते.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेत आता अनेकजण गुंतवणूक करत आहेत. यात त्यांना योजनेद्वारे प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळत राहते. यालाच वार्षिकी हप्ता असे म्हणतात. यात डिपॉझिटचा कालावधी 3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असूतो आणि त्याचा व्याजदर हा मुदत ठेव योजनेप्रमाणेच आहे.

परंतु त्याची किमान रक्कम 25 हजार रुपये इतकी आहे. तसेच यात आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे गरजेच्या वेळी गुंतवणूकदारांना त्यावर 75 % पर्यंत कर्ज घेता येते. इतकेच नाही तर तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही ते कोणत्याही जवळच्या SBI शाखेत ट्रान्सफर करू शकता.

गुंतवणूकदारांची इच्छा असेल तर ते एलआयसी अॅन्युइटी प्लॅनमध्येही गुंतवणूक करू शकतात. हे वेगवगेळ्या प्रकारचे वार्षिकी प्लॅन ऑफर करत असून त्याच्या फ्लॅगशिप अॅन्युइटी प्लॅन आहेत जसे की – LIC नवीन जीवन निधी योजना, LIC जीवन शांती योजना आणि LIC जीवन अक्षय VII योजना.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe