Asian Paints च्या शेअर्समध्ये तुफान तेजी ! कंपनीचे तिमाही निकाल जाहीर, वाचा सविस्तर

Published on -

Asian Paints Share Price : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पेंट्स उत्पादक कंपनी एशियन पेंट्स लिमिटेडने आज 12 नोव्हेंबर रोजी सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालात सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 43% वाढ होऊन 994 कोटी रुपये झाले असे जाहीर करण्यात आले.

कंपनीच्या डेकोरेटिव्ह, ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक पेंट्स व्यवसायात चांगली कामगिरी झाल्याचे निकालातून स्पष्ट होते. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने प्रति शेअर 4.5 रुपयांचा अंतरिम लाभांश सुद्धा जाहीर केला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर आणि अंतरीम लाभांश जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व तेजी सुद्धा दिसून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर एशियन पेंटचे शेअर पाच टक्क्यांनी वाढलेत. एनएसईवर एशियन पेंटच्या शेअरची किंमत 2787 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचली. 

कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत ? 

कंपनीची एकत्रित निव्वळ विक्री 6.4% वाढून 8513.7 कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीची एकत्रित निव्वळ विक्री 8003 कोटी रुपये होती.

विशेष बाब म्हणजे या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीमध्ये स्वातंत्र आधारावर निव्वळ विक्री 5.8 टक्क्यांनी वाढून 7,336 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 43% वाढून 994 कोटी रुपये झालाय. 

शेअर्समध्ये आली मोठी तेजी

कंपनीने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर तसेच लाभांश जाहीर केल्यानंतर या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. आज बारा नोव्हेंबर रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. एशियन पेंट्सचे शेअर्स आज पाच टक्क्यांनी वाढून 2787 रुपयांवर पोहोचले आहेत.

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर साडेचार रुपयांचा अंतरीम लाभांश जाहीर केला असून यासाठीचे रेकॉर्ड आहेत अजून फायनल झालेली नाही. पण लवकरच कंपनी याच्या रेकॉर्ड डेटची घोषणा करण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe