पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 8 लाख रुपये !

Ahmednagarlive24 office
Published:
Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात अलीकडे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि गरजेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिस मध्ये सुरू असलेल्या एका जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुंतवणूकदारांनी महिन्याला एक हजार रुपये गुंतवले तरी देखील त्यांना आठ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे.

कोणती आहे योजना?

जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि ग्यारंटेड परतावा मिळावा यासाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थातच पीपीएफ योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

ही एक सरकारी योजना असून यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. या योजनेला सरकार स्वतः हमी देते. म्हणजेच यामध्ये गुंतवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत गुंतवलेला एकही रुपया वाया जाणार नाही.

कसे आहे योजनेचे स्वरूप

ही योजना पंधरा वर्षांची आहे. म्हणजेच पंधरा वर्षानंतर ही योजना परिपक्व होत असते. विशेष म्हणजे जर तुम्हाला पंधरा वर्षानंतरही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पाच-पाच वर्षांसाठी ही योजना पुढे एक्सटेंड करू शकता.

या योजनेत वार्षिक किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या स्थितीला या योजनेअंतर्गत 7.1% या इंटरेस्ट रेटने रिटर्न दिले जात आहे.

यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत खाते उघडू शकता. तुम्ही या योजनेत महिन्याला फक्त 1,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही काही वर्षांत 8 लाखांपेक्षा जास्त रक्कम जोडू शकता.

आठ लाख रुपयांची रक्कम कशी तयार होणार

खरे तर या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे. मात्र जर तुम्हाला एक हजार रुपये महिन्याची गुंतवणूक करून आठ लाख रुपयांची रक्कम जमा करायची असेल तर तुम्हाला पंधरा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढे आणखी 10 वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवावी लागणार आहे.

म्हणजेच तुम्हाला या योजनेत 25 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही पंचवीस वर्षांसाठी प्रति महिना 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 वर्षांनी आठ लाख 24 हजार 641 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची गुंतवणूक तीन लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित पाच लाख 24 हजार 641 रुपये तुम्हाला व्याज म्हणून मिळणार आहेत.

या योजनेत दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही, याशिवाय, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर देखील कर लागत नाही आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम देखील करमुक्त असते. म्हणजे गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीच्या रक्कम ही करमुक्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe