Bajaj Finance Share: बजाज फायनान्सचा धमाका! 50 शेअर्सचे होणार 500… कसे ते वाचा?

Published on -

Bajaj Finance Share:- आज शेअर बाजारात एका मोठ्या आर्थिक निर्णयामुळे बजाज फायनान्स पुन्हा चर्चेत आली आहे. गुंतवणूकदारांच्या नजरा या स्टॉकवर लागल्या आहेत कारण कंपनीने शेअर स्प्लिट आणि बोनस इश्यू अशा दुहेरी गोड बातम्या दिल्या आहेत. शेअरधारकांसाठी ही संधी कमालीची असल्याने, बाजारात या घोषणेमुळे चैतन्य पसरले आहे.

बजाज फायनान्स ही देशातील एक आघाडीची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च तिमाहीच्या निकालांबरोबरच कंपनीने दोन मोठ्या निर्णयांची घोषणा केली. त्यातील एक म्हणजे शेअर स्प्लिट आणि दुसरी म्हणजे बोनस शेअर्स वाटप. यामध्ये कंपनी आपल्या ₹२ दर्शनी मूल्याच्या एका शेअरचे दोन शेअर्समध्ये रूपांतर करणार आहे, म्हणजेच आता प्रत्येक शेअरचे दोन भाग होतील. याशिवाय, प्रत्येक शेअरहोल्डरला त्यांच्या मालकीच्या प्रत्येक शेअरसाठी चार बोनस शेअर्सही मिळणार आहेत.

कशी राहील नेमकी ही प्रक्रिया?

या दोन्ही गोष्टींसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट १६ जून जाहीर केली आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे १३ जूनच्या शेवटी बजाज फायनान्सचे शेअर्स असतील, तर ते या लाभांसाठी पात्र ठरतील. उदाहरण द्यायचं झालं, तर जर तुमच्याकडे सध्या ५० शेअर्स असतील, तर तुम्हाला बोनस म्हणून २०० शेअर्स मिळतील म्हणजेच एकूण २५०. त्यानंतर जेव्हा शेअर स्प्लिट होईल, तेव्हा हे २५० शेअर्स ५०० शेअर्समध्ये रूपांतरित होतील.

कंपनीने ही संपूर्ण प्रक्रिया २७ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने बजाज फायनान्समध्ये पैसा लावला आहे, त्यांच्यासाठी हा एक मोठा बोनसच ठरणार आहे. मात्र हे लक्षात ठेवायला हवे की शेअर्सची संख्या वाढली तरी कंपनीचे एकूण मूल्य (मार्केट कॅप) तसेच राहते. पण लहान गुंतवणूकदारांना या माध्यमातून अधिक सहजतेने शेअर्स मिळवण्याची संधी निर्माण होते.

आज बजाज फायनान्सच्या शेअरची स्थिती काय?

आजच्या व्यवहारात बजाज फायनान्सचा शेअर किंचित म्हणजेच ०.४% घटला असून तो सध्या ₹९,५६८ वर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये ६% ची वाढ झाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरने जवळपास ३८% वाढ दाखवली असून, निफ्टी ५० मधील सर्वोत्तम परफॉर्मरपैकी एक बनला आहे.

एकंदरीत पाहता ज्या गुंतवणूकदारांनी संयम ठेवून बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक टिकवून ठेवली आहे, त्यांच्यासाठी ही घोषणा एक मोठी कमाई घेऊन येणार आहे. आता पाहायचं ते म्हणजे या निर्णयाचा दीर्घकालीन प्रभाव आणि गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कसा राहतो हे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News