बजाज फायनान्सच्या एका निर्णयाने शेअरचा दर 90% घसरला…पण यामागील कारण वेगळंच! बघा संधी की धोका

Published on -

Bajaj Finance Share Price:- आज शेअर बाजार उघडताच बजाज फायनान्सच्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला. शुक्रवारपर्यंत तब्बल ९३०० रुपयांवर असलेला हा शेअर सोमवारी ९५० रुपयांच्या आसपास घसरलेला दिसला. एकाच दिवसात इतकी मोठी घसरण? पण खरी कहाणी थोडी वेगळी आहे. ही किंमतीतील घट म्हणजे कोहीतरी गडबड नाही, तर कंपनीच्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा परिणाम असून यामागे आहे बोनस शेअर्स व स्टॉक स्प्लिट.

बजाज फायनान्सने जाहीर केला आहे बोनस

बजाज फायनान्सने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एकप्रकारे ‘बक्षीस’ जाहीर केलं आहे. कंपनीने ४:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर एक शेअर असेल, तर त्याच्या बदल्यात आणखी चार शेअर्स मिळणार आहेत. त्यामुळे तुमचे शेअर्स पाच पट होतात. याबरोबरच कंपनीने स्टॉक स्प्लिटही केलं आहे.म्हणजेच दोन रुपयांच्या एका शेअरचे दोन एक रुपयांचे शेअर्स केले गेले आहेत. परिणामी, गुंतवणूकदारांच्या खात्यातील शेअर्सची संख्या लक्षणीय वाढली आहे.

म्हणूनच आज बाजार उघडताच शेअरची किंमत सुमारे ९५० रुपयांपर्यंत खाली आली, पण त्याचा अर्थ असा नाही की कंपनीत काही गडबड आहे. किंमतीतील ही घसरण ‘तांत्रिक’ आहे.कारण शेअर्सची संख्या वाढल्याने शेअरच्या किंमतीचे समायोजन झाले आहे. मात्र, कंपनीचे एकूण मूल्य म्हणजेच मार्केट कॅप तेच राहिले आहे.

या प्रक्रियेचा उद्देश काय?

या सगळ्या प्रक्रियेचा उद्देश स्पष्ट आहे.शेअरची किंमत थोडीशी ‘परवडणारी’ बनवायची, जेणेकरून लहान गुंतवणूकदार देखील सहज गुंतवणूक करू शकतील. ज्यांना शेअर ९००० पेक्षा जास्त किमतीमुळे महाग वाटत होते, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.बाजारात सध्या बजाज फायनान्सचे शेअर्स जवळपास ९३६ रुपये या दराने व्यवहार करत आहेत. मोठ्या किंमतीचा शेअर छोट्या भागांमध्ये विभागल्यामुळे ट्रेडिंगसुद्धा अधिक सुलभ होते.त्यामुळे ज्यांनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!