Bank FD : SBI, HDFC नाही तर, ‘ही’ बँक एफडीवर देतेय 9 टक्क्यांपर्यंत व्याज, बघा…

Content Team
Published:
Bank FD

Bank FD : सध्या एफडी करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल, जना स्मॉल फायनान्स बँक सध्या आपल्या एफडीवर सर्वात जास्त व्याजदर ऑफर करत आहे, या बँकेचा व्याजदर हा इतर बँकापेक्षा खूप जास्त आहे, जर तुम्हाला तुमच्या एफडीवर अधिक फायदा मिळवायचा असल्यास तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता.

बऱ्याच काळापासून लोकांमध्ये मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशातच बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो ठेवींवर सर्वाधिक व्याजदर कोणती बँक देत आहे? तुम्हालाही हीच अडचण असेल तर तुम्ही अगदी डोळे झाकून या बँकेत गुंतवणूक करू शकता. कारण सध्या कोणतीही बँक यापेक्षा जास्त व्याजदर देत नाही.

देशातील सर्वात मोठ्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक यांच्या पेक्षाही काही पटीने ही बँक एफडीवर व्याज देत आहेत.

अलीकडेच या स्मॉल फायनान्स बँकेने म्हणजेच जना स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर अपडेट केले आहेत. जना स्मॉल फायनान्स बँकेचे हे व्याजदर 2 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.नवीन बदलामध्ये, बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 9% आणि सामान्य नागरिकांना 1 वर्षाच्या कालावधीत 8.50% व्याजदर देत आहे. सध्या कोणतीच बँक 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करत नाही.

जना स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर

-जन स्मॉल फायनान्स बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर वर 3.00% व्याजदर ऑफर करते आहे.

-15-60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.25 टक्के व्याजदर देत आहे.

-61-90 दिवसांच्या बँक एफडीवर आता 5.00 टक्के व्याजदर देत आहे.

-91-180 दिवसांच्या कालावधीसाठी बँक 6.50 टक्के पर्यंत व्याजदर देत आहे.

-याशिवाय बँक 181 ते 364 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 8.00 टक्के व्याजदर देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe