Bank holidays in June 2023 : दोन दिवसांनंतर मे महिना संपून जून महिना सुरु होणार आहे. अशा वेळी नवीन महिन्याच्या सुरुवातीला बँका महिन्याच्या सुट्ट्या जाहीर करत असतात. त्यानुसार आज आम्ही तुम्हाला जून महिन्यातील बँक सुट्ट्यांबद्दल सांगणार आहे.
यामुळे तुम्ही पुढील महिन्यात बँकांसंबंधी कामे लवकरात लवकर उरकून ज्या दिवशी बँकांना सुट्टी आहे त्या दिवशी बँक कामांचे नियोजन आखू नका. यामुळे तुमची महत्वाची कामे मार्गी लागणार नाहीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, जूनमध्ये बँका 12 दिवस बंद राहतील. सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश होतो. जून महिन्यात वाय.एम.ए. डे/राजा संक्रांती, कांग (रथजत्रा)/रथयात्रा, खर्ची पूजा, बकरीद ईद (ईद-उल-जुहा), आणि रेमना नी/ईद-उल-जुहा या प्रसंगी बँका बंद राहतील.
सविस्तर यादी तुम्ही जाणून घ्या
4 जून 2023: रविवारमुळे बँका बंद राहतील.
10 जून 2023: दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
11 जून 2023: रविवारी सर्व बँका बंद राहतील.
15 जून 2023: ओडिशा आणि मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
18 जून 2023: रविवारमुळे बँका बंद राहतील.
20 जून 2023: ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील.
24 जून 2023: चौथ्या शनिवारी सर्व बँका बंद राहतील.
25 जून 2023: बँकांना रविवारी सुट्टी आहे.
26 जून 2023: त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील.
28 जून 2023: केरळ, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये ईद उल अजहा निमित्त बँका बंद राहतील.
29 जून 2023: ईद उल अजहा निमित्त बँका बंद राहतील.
30 जून 2023: मिझोराम आणि ओडिशामध्ये रिमा ईद उल अजहा मुळे बँका बंद राहतील.
अशा प्रकारे हे दिवस वगळता इतर दिवस बँक चालू राहतील ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व बँक कामे इतर दिवसात मार्गी लावू शकता.